जाहिरात
मराठी बातम्या / देश / शुभमुहूर्ताचं कारण देत 11 वर्ष पतीपासून दूर राहिली पत्नी; अखेर न्यायालयाने दिला तरुणाला दिलासा

शुभमुहूर्ताचं कारण देत 11 वर्ष पतीपासून दूर राहिली पत्नी; अखेर न्यायालयाने दिला तरुणाला दिलासा

शुभमुहूर्ताचं कारण देत 11 वर्ष पतीपासून दूर राहिली पत्नी; अखेर न्यायालयाने दिला तरुणाला दिलासा

हिंदू विवाह कायद्यांतर्गत न्यायालयाने हे लग्न मोडीत काढलं आहे. घटस्फोटाच्या आदेशाला हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13 (IB) अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

रायपूर 05 जानेवारी : लग्नाचं एक अतिशय विचित्र प्रकरण (Weird Marriage Case) नुकतंच समोर आलं आहे. यात एक महिला शुभमुहूर्ताचं कारण देत तब्बल 11 वर्ष आपल्या सासरी येण्यास नकार देत राहिली. याप्रकरणात आता छत्तीसगड उच्च न्यायालयाने (Chhattisgarh High Court) घटस्फोटाचा (Divorce) आदेश जारी केला आहे. न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि रजनी दुबे यांच्या खंडपीठाने असं निरीक्षण नोंदवलं की शुभमुहूर्त हा कुटुंबाच्या आनंदासाठी असतो. मात्र महिलेनं याचा नवीन घर सुरू करण्यासाठी अडथळा म्हणून वापर केला आहे. फेक अकाऊंट बनवून बहिणीलाच ओढलं प्रेमाच्या जाळ्यात; 10 वर्षांनी फुटलं बिंग हिंदू विवाह कायद्यांतर्गत न्यायालयाने हे लग्न मोडीत काढलं आहे. घटस्फोटाच्या आदेशाला हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13 (IB) अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलेल्या आपल्या आदेशात म्हटलं आहे की, वस्तुस्थितीनुसार पत्नीने पतीला पूर्णपणे सोडलं आहे, त्यामुळे तो घटस्फोट घेण्यास पात्र आहे. या आदेशाची प्रत आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. अपीलकर्ता संतोष सिंह यांनी यापूर्वी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती, मात्र ही याचिका फेटाळली गेली होती. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकेनुसार, संतोष सिंहचा जुलै 2010 मध्ये विवाह झाला होता. तो 11 दिवस आपल्या पत्नीसोबत राहिला. त्यानंतर पत्नीचे कुटुंबीय आले आणि काहीतरी महत्त्वाचं काम असल्याचं सांगून महिलेला आपल्यासोबत घेऊन गेले. यानंतर पतीने तिला तिच्या माहेरून सासरच्या घरी आणण्याचा दोनदा प्रयत्न केला. मात्र हा शुभमुहूर्त नसल्याचं सांगत पत्नीने येण्यास नकार दिला आहे. पत्नीसोबतच्या प्रत्येक भांडणानंतर पती गुपचूप करायचा हे काम; समजताच हादरली महिला याचिकेला उत्तर देताना पत्नीने असा युक्तिवाद केला आहे की, ती पतीच्या घरी यायला तयार होती पण शुभमुहूर्त सुरू झाल्यावर तो तिला परत घेण्यासाठी पुन्हा आला नाही, जे त्यांच्या प्रथेनुसार आवश्यक होते. पत्नीने असंही सांगितलं की तिने आपल्या पतीला सोडलं नाही. तर पतीच प्रथेनुसार तिला परत घेण्यासाठी गेला नाही. मात्र, तरीही कोर्टाने या प्रकरणात महत्त्वाचा निर्णय देत घटस्फोटाचा आदेश जारी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात