जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हसत्या खेळत्या लेकराचा अज्ञाताने चिरला गळा; बीडमधील माणुसकीला काळिमा फासणारी घटना

हसत्या खेळत्या लेकराचा अज्ञाताने चिरला गळा; बीडमधील माणुसकीला काळिमा फासणारी घटना

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Murder in Beed: बीड जिल्ह्यातील सोनिमोहा याठिकाणी एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलाची गळा चिरून हत्या (Minor boy murder by slitting throat) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 05 जानेवारी: बीड (Beed) जिल्ह्यातील सोनिमोहा याठिकाणी एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलाची गळा चिरून हत्या (Minor boy murder by slitting throat) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित सहा वर्षीय मुलावर अज्ञात वन्यपशूने हल्ला केला असावा, अशी चर्चा गावात होती. मात्र पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केला असता, हा हल्ला कोणत्याही प्राण्याने केला नसून चिमुकल्याची गळा चिरून हत्या करण्यात आली असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास धारुर पोलीस करत आहेत. यशराज दत्तात्रय दराडे असं हत्या झालेल्या सहा वर्षीय अल्पवयीन मुलाचं नाव आहे. तो बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील सोनिमोहा येथील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी 3 जानेवारी रोजी यशराज एका शेतात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. यशराजच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा आढळल्या होत्या. ही घटना समोर येताच नातेवाईकांनी यशराज याला अंबाजोगाई येथील रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण याठिकाणी उपचार घेत असताना, चिमुकल्याची प्राणज्योत मालवली आहे. हेही वाचा- अल्पवयीन मुलांकडून सिनेस्टाईल खून; दुकानात लपलेल्या तरुणाला रस्त्यावर आणून ठेचलं चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील हिंस्त्र जखमा पाहून त्याच्या एखाद्या वन्यपशूने हल्ला केला असावा, अशी चर्चा गावात रंगली होती. पण या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या अधिकाऱ्याच्या मदतीने पोलिसांनी संपूर्ण परिसराची कसून पाहाणी केली. पण हिंस्त्रप्राण्याचे ठसे किंवा इतर कोणतेही संकेत पोलिसांना आढळले नाहीत. हेही वाचा- Nagpur: माहेरी आली अन् सख्ख्या भावाची ठरली बळी; बहिणीचा तडफडून झाला मृत्यू त्यामुळे चिमुकल्याची अज्ञात व्यक्तीने गळा चिरून हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी धारूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित चिमुकल्याला एवढ्या क्रूरतेनं नेमकं कोणी मारलं असेल, याचा तपास धारूर पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात