नवी मुंबई, 18 नोव्हेंबर: संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून(18 नोव्हेंबर)सुरू होणार आहे. यावेळी संसदेत राम मंदिर उभारण्याबाबत, जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir)आणि नागरिकता संशोधन यासोबत इतर अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यासोबत आर्थिक मंदी, वाढती बेरोजगारी या विषयांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षांना दिलं आहे.
सध्या एकूण 43 विधेयक अजूनही प्रलंबित आहेत. जे संसदेत अद्यापही मंजूर झाले नाहीत. संसदेच्या या सत्रात सगळ्या वादग्रस्त असणारा मुद्दा म्हणजे विवादित नागरिकता (संशोधन) विधेयक मोदी सरकार या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करण्याची अधिक शक्यता आहे. यासोबत महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये वादळामुळे आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानावर चर्चा होणार का हे पाहाणंही महत्त्वाचं ठरणार आहे. हिवाळी अधिवेशनात 18 नोव्हेंबर ते 13 डिसेंबसपर्यंत चालणार असून 27 विधेयक मंजुरीसाठी दोन्ही सभागृहात मांडली जाणार आहेत. संसदेत मांडली जाणारी विधेयक पुढील प्रमाणे व्यक्तिगत माहिती संरक्षण तृतीय़पंतीयांचे हक्क आणि संरक्षण इलेक्ट्रिक सिगरेट प्रतिबंध औद्योगिक क्षेत्रासोबत निगडित संहिता कर दुरुस्ती विधेयक चिट फंड दुरुस्ती विधेयक सरोगसी नियंत्रण विधेयक
Winter Session of Parliament begins today
— ANI Digital (@ani_digital) November 18, 2019
Read @ANI Story | https://t.co/VPd2zBkUDK pic.twitter.com/uRmC0GRJqu
यासारखे अन्य़ विधेयक संसदेत मांडली जाणार असून त्यावर चर्चा केली जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 28 विधेयक मंजूर करण्यात आली होती. त्यामध्ये जम्मू-काश्मीर विभाजन आणि विशेष अधिकार रद्द करणारे विधेयक, अवैध कृत्य प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले होते. यंदाच्या अधिवेशनात राम मंदिर, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांसाठी मदत निधी, बेरोजगारी, आर्थिक मंदी आणि व्यापाराबाबत महत्त्वांच्या मुद्द्यांवर चर्चा होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.