नवी दिल्ली, 29 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच दुकानं बंद आहे. महसूल वाढावा यासाठी मद्यविक्री सुरू करा, अशी मागणी एकीकडे सरकारकडे केली जात आहे. परंतु, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि नवी दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांनी मद्यपान करणार्यांना इशारा दिला आहे.
अल्कोहोल पिण्यामुळे रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. अशा लोकांना कोरोना विषाणूमूळे असुरक्षित होण्याचा धोका जास्त असतो, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. त्याच वेळी, पंजाब, केरळ आणि इतर राज्ये दारूची दुकाने उघडण्याचा मानस आहेत आणि महसूलसाठी लोकांचे जीवन धोक्यात घालत आहेत. याच प्रकारचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने देखील दिला आहे.
हेही वाचा -इतक्या दिवसांचा असावा लॉकडाऊन, आनंद महिंद्रा यांनी सरकारला दिला सल्ला
कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या काळात दारूची दुकाने उघडणे धोकादायक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दारूची दुकाने लॉकडाउन दरम्यान ही दुकाने बंद ठेवली आहे हे योग्यच आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि नवी दिल्लीतील एम्सने स्पष्ट केलं आहे.
एम्सच्या अहवालानुसार, देशात सुमारे 7.7 कोटी लोकं मद्यपान करतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार गेल्या वर्षात मद्यपान केल्यामुळे दोन लाख 60 हजार लोक मरण पावले. त्यामुळे या परिस्थितीत लॉकडाउन दरम्यान, आरोग्याच्या दृष्टीने दारूची दुकाने बंद ठेवण्यात आवश्यकता आहे. जिथे दुकाने मोकळी आहेत तिथे मृत्यूची शक्यता जास्त असते.
हेही वाचा -वारंवार धुतल्याने हात झाले ड्राय, घरगुती उपायांनी पुन्हा होतील सॉफ्ट सॉफ्ट
भारत, थायलंड आणि दक्षिण आफ्रिकन देशांमध्ये मद्याची दुकाने बंद आहेत. परंतु, बहुतेक पाश्चात्य देशांमध्ये असे नाही. या संसर्गामुळे वाईट रीतीने प्रभावित झालेल्या न्यूयॉर्कमधील दारूची दुकाने आवश्यक सेवांच्या अंतर्गत उघडत आहेत. त्यामुळे येथे मृत्यू देखील वाढत आहेत. यामध्ये सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहे.
युरोपियन देशांमध्येही जागतिक आरोग्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर देखील दुकाने उघडली जातात. त्यामुळे या देशात मृत्यूचे प्रमाण सतत वाढत आहे. जगभरात दरवर्षी 3 दशलक्ष लोक दारू पिल्यामुळे मरतात. युरोपमध्ये होणाऱ्या मृत्यू पैकी एक तृतीयांश मृत्यू मद्यपान केल्यामुळे होतो. बहुतेक लोकांनी कोरोनामध्ये मद्यपान केले. पुरुषही यात अधिक आहेत.
हेही वाचा -धक्कादायक! दारू समजून प्यायला सॅनिटायझर? साताऱ्यातील तिघांचा मृत्यू
एका अभ्यासानुसार, मृत होणाऱ्या संक्रमित व्यक्तींपैकी दहा जणामध्ये एक जण नशेत होता. कोरोना व्हायरस दारू पिण्यामुळे नष्ट होतो हा संभ्रम आहे. इथेनॉल आणि मिथेनॉल मिसळून तयार केलेला अल्कोहोल आरोग्याशी संबंधित अनेक तक्रारींना कारणीभूत ठरू शकतो. अहवालात असे म्हटले आहे की, काळजीपूर्वक निर्णय घ्या. कारण आपली एक चूक आपल्या आयुष्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी कठीण असू शकते,असा सल्ला देखील जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.