नवी दिल्ली, 29 एप्रिल : कोरोनाला रोखण्यासाठी भारतात सध्या 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 30 हजारांवर गेल्यामुळं लॉकडाऊनचा हा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन (Mahindra Group) आनंद महिंद्रा यांनी सरकारला लॉकडाऊनबाबत सल्ला दिला आहे. आनंद महिंद्रा यांनी सरकारला लॉकडाऊनचा कालावधी 49 दिवसांचा असावा असे सांगितले आहे. जर देशातील काही भागांत हळुहळु लॉकडाऊन शिथील झाला तर त्याचा परिणाम औद्योगित क्षेत्रावर होईल. औद्योगिक कामे चालवणे कठीण होईल आणि त्यांचा वेगही कमी होईल. महिंद्रांनी कबूल केले की लॉकडाउनमधून बाहेर पडण्याची योजना आखणे सरकारसाठी आव्हानात्मक आहे कारण अर्थव्यवस्थेच्या सर्व गोष्टी एकमेकांशी खूप जोडल्या गेलेल्या आहेत. ते म्हणाले की, पुढील नियोजन मोठ्या प्रमाणात संक्रमण नियंत्रित करण्यासाठी व चाचणीवर आधारित असले पाहिजे. केवळ हॉटस्पॉट्स आणि जनतेचे अतिसंवेदनशील गट वेगळे ठेवावेत. वाचा- धक्कादायक! दारू समजून प्यायला सॅनिटायझर? साताऱ्यातील तिघांचा मृत्यू
वाचा- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांनी पार केला 9 हजारांचा टप्पा, 400 जणांनी सोडले प्राण 49 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत, काही रिसर्चमधून असे कळले आहे की, 49 दिवसांचा लॉकडाऊन खूप आहे. हे खरे असल्यास, हा कालावधी निश्चित केला जावा. मला विश्वास आहे की जर लॉकडाऊन शिथील केले तर तो व्यापक प्रमाणात असावा. ते म्हणाले की लॉकडाउन हटविल्यानंतर नियंत्रण भागात मोठ्या प्रमाणात संसर्ग निदान व चाचणी घेण्यात याव्यात, तर केवळ हॉटस्पॉट्स व जनतेतील असुरक्षित विभाग स्वतंत्र ठेवावेत. लॉकडाऊन नंतर ही रणनीती असावी. वाचा- Work From Home जुलैपर्यंत मिळणार घरून काम करण्याची सूट, केंद्राची घोषणा
The Govt has a complex challenge planning an exit from the lockdown. It’s crystal clear that ALL supply chains & ALL elements of the economy are intricately interrelated.For example, humble roadside dhabas may seem ‘non-essential’ but truckers can’t journey without them (1/3)
— anand mahindra (@anandmahindra) April 28, 2020
औद्योगित उपक्रम चालू ठेवणे कठिण महिंद्रा यांच्या मते जर लॉकडाऊन हळुहळु शिथील करण्यात आला तर, त्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावर होईल. उत्पादन कारखान्यांचा प्रश्न आहे, जर त्यामध्ये फीडर फॅक्टरी देखील बंद झाली तर उत्पादनं होणार नाहीत. दरम्यान 25 मार्चपासून देशात सार्वजनिक निर्बंध लागू आहेत. 3 मे पर्यंत दोन टप्प्यांत याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. 20 एप्रिलपासून ग्रामीण भागात कारखान्यांना व इतर काही व्यवसायिक कामांना राज्यांच्या सूचना व सूचनांनुसार पुन्हा नव्याने परवानगी देण्यात आली. संपादन, संकलन-प्रियांका गावडे