Home /News /lifestyle /

वारंवार धुतल्याने हात झाले ड्राय, घरगुती उपायांनी पुन्हा होतील सॉफ्ट सॉफ्ट

वारंवार धुतल्याने हात झाले ड्राय, घरगुती उपायांनी पुन्हा होतील सॉफ्ट सॉफ्ट

प्रामुख्याने कोरोना व्हायरस हा हाताला लागून तो शरीरात घुसतो असं संशोधनातू दिसून आलं होतं. त्यामुळे वारंवार हात धुण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

प्रामुख्याने कोरोना व्हायरस हा हाताला लागून तो शरीरात घुसतो असं संशोधनातू दिसून आलं होतं. त्यामुळे वारंवार हात धुण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

वारंवार हात धुऊन (hand wash) कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचाव तर होत आहे, मात्र त्याचवेळी हातही कोरडे (hand dry) पडू लागलेत.

    मुंबई, 29 एप्रिल : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचावासाठी आपण साबण, हँडवॉशने वारंवार हात धुत (hand wash) आहोत. कोरोनापासून बचाव करण्याच्या या प्रयत्न हातांच्या त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. हात कोरडे पडणं (dry hand), हातांना खाज येणं, रॅशेस येणं अशा समस्या होऊ शकतात. तुमचेही हात कोरडे पडू लागलेत का तर मग घरच्या घरच्या उपाय करून तुम्ही तुमचे हात पुन्हा सॉफ्ट बनवू शकता. कसे ते पाहुयात कोरफड कोरफडीच्या गरात त्वचा मुलायम करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात. हातांवर कोरफडीचा गर लावल्याने एक प्रकारचा लेयर तयार होतो, ज्यामुळे कोरडेपणा दूर होता. त्यामुळे झोपताना तुम्ही हातांना कोरफडीचा गर लावा. दुसऱ्या दिवशी तुमचे हात मुलायम वाटतील. दही आणि केळं त्वचेचा रंग उजळण्यासाठी दही आणि केळ्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे हात मुलायम करण्यासाठीही तुम्ही केळं आणि दही वापरू शकता. केळं कुस्करून ते दह्यात मिक्स करा आणि या पेस्टने हातांना मसाज करा. नियमित असं केल्यानं पाहा तुमचे हात मुलायम होतात की नाही. शुगर स्क्रब  हातांवर मृत पेशी साचल्याने हात कोरडे होतात. अशावेळी तुम्ही दाणेदार साखरेचा वापर करून या मृत पेशी काढून टाकू शकता. एक चमचा खोबरेल तेलात साखर मिसळून घ्या. 5 मिनिटांनंतर हा स्क्रब हातांवर लावा. आठवड्यातून एक ते दोन वेळा याचा वापर केल्याने हात मुलायम होऊ शकतात. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा घाणेरडे कुठले! टॉयलेटनंतरही धुत नाहीत हात; आता काय म्हणावं या लोकांना Coronavirus : साबण की सॅनिटायझर, व्हायरसपासून बचावासाठी काय वापरणं योग्य?
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Lifestyle

    पुढील बातम्या