Home /News /maharashtra /

धक्कादायक! दारू समजून प्यायला सॅनिटायझर? साताऱ्यातील तिघांचा मृत्यू

धक्कादायक! दारू समजून प्यायला सॅनिटायझर? साताऱ्यातील तिघांचा मृत्यू

देशभरात दारूच्या दुकानांवर बंदी असल्यानं दारू मिळत नाही. कित्येक दिवसांपासून दारू मिळत नसल्यानं अनेक तळीरामांची मोठी गैरसोय झाली आहे.

    सातारा, 29 एप्रिल : राज्यात कोरोनाचं थैमान सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अद्यापतरी अत्यावश्यक सेवा वगळता रेड झोनमध्ये दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली नाही. 3 मेपर्यंत लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळण्यात येत आहे. देशभरात दारूच्या दुकानांवर बंदी असल्यानं दारू मिळत नाही. कित्येक दिवसांपासून दारू मिळत नसल्यानं अनेक तळीरामांची मोठी गैरसोय झाली आहे. साताऱ्यात दारू समजून पेय घेतल्यानं तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दर या तरुणांना दारू न मिळाल्यामुळे सॅनिटायझर सेवन केल्याची चर्चा आहे. पोलिसांनीही तशी शंका व्यक्त केली आहे. लॉकडाऊनदरम्यान दारूविक्री बंद असल्यामुळे फटलट तालुक्यातील जिंती इथे हा प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे पेय घेतल्यामुळे तिघांना उलटी झाली आणि चक्कार येऊ लागली. किरण सावंत, दीपक जाधव आणि अशोक रणवरे अशी त्यांची नावे आहेत. दारूचं व्यसन आणि ती न मिळाल्यानं त्यांनी सॅनिटायझर प्यायल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं त्यानंतर त्यांना बरं वाटू लागल्यानंतर घरी सोडण्याच आलं मात्र पुन्हा तोच त्रास होऊ लागला आणि या तिघांचा मृत्यू झाला आहे. या तिघांचाही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे वाचा-नवरा-बायकोच्या भांडणात निर्दयी आईनं 8 महिन्यांच्या चिमुरडीला फेकलं विहिरीत राज्यात मंगळवारी कोरोनाबाधित 729 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9318 झाली आहे. दरम्यान, राज्यात आज एकूण 31 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे 25, जळगाव येथील 4 तर पुणे शहरातील 2 आहेत. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता एकूण 400 झाली आहे. त्यात आनंदाची बाब म्हणजे आज 106 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरोग्य विभागाने दिलेली माहिती अशी की, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1,29,931 नमुन्यांपैकी 1,20,136 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 9318 जण पॉझिटिव्ह आले आहेत. हे वाचा-Lockdown संपायला राहिले फक्त 5 दिवस, सरकारची चिंता वाढली
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Satara

    पुढील बातम्या