जाहिरात
मराठी बातम्या / देश / फाशी देण्यापूर्वी जल्लाद गुन्हेगाराच्या कानात काय बोलतो माहीत आहे का?

फाशी देण्यापूर्वी जल्लाद गुन्हेगाराच्या कानात काय बोलतो माहीत आहे का?

फाशी देण्यापूर्वी जल्लाद गुन्हेगाराच्या कानात काय बोलतो माहीत आहे का?

कोणत्याही गुन्हेगाराला फाशी देण्याआधी, जल्लाद कैद्याच्या वजनाचा पुतळा लटकवून फासाची परीक्षा करतो आणि त्यानंतर प्रत्यक्ष गुन्हेगाराला फाशी दिली जाते. दोषीच्या नातेवाईकांना 15 दिवस अगोदर कळवलं जातं की, ते कैद्याला केव्हा शेवटचं भेटू शकतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 9 एप्रिल : सध्या देशभरात शबनम प्रकरणाची चर्चा जोरात सुरू आहे. स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच एका महिलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शबनम नावाच्या महिलेला उत्तर प्रदेशच्या मथुरा तुरुंगात फाशी दिली जाणार आहे. मात्र, फाशीची तारीख निश्चित व्हायची आहे. शबनमने तिचा प्रियकर सलीमसोबत तिच्याच घरात हत्याकांड घडवून आणलं. ती सध्या रामपूर कारागृहात आहे. जाणून घेऊ, शबनम प्रकरण काय आहे आणि फाशी देण्यापूर्वी जल्लाद गुन्हेगाराच्या कानात काय बोलतो. फाशी देण्यापूर्वी काय होतं? कोणत्याही गुन्हेगाराला फाशी देण्याआधी, जल्लाद कैद्याच्या वजनाचा पुतळा लटकवून फासाची परीक्षा करतो आणि त्यानंतर प्रत्यक्ष गुन्हेगाराला फाशी दिली जाते. दोषीच्या नातेवाईकांना 15 दिवस अगोदर कळवलं जातं की, ते कैद्याला केव्हा शेवटचं भेटू शकतात. फाशी देणारा ‘हे’ शेवटचे शब्द दोषी व्यक्तीच्या कानात म्हणतो फाशी देण्यापूर्वी जल्लाद गुन्हेगाराकडे जातो आणि त्याच्या कानात म्हणतो, “मला माफ कर, मी सरकारी कर्मचारी आहे. मला कायद्यानं ही कृती करण्यास भाग पाडलं आहे.” यानंतर, जर गुन्हेगार हिंदू असेल तर, जल्लाद त्याला राम-राम म्हणतो, तर गुन्हेगार मुस्लीम असल्यास त्याला शेवटचा सलाम (आखिरी दफा सलाम) म्हणतो. असं म्हटल्यानंतर, जल्लाद लीव्हर ओढतो आणि दोषीचा जीव जाईपर्यंत त्याला लटकवतो. यानंतर, डॉक्टर गुन्हेगाराची नाडीपरीक्षा करतात. मृत्यूची खात्री झाल्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो. हे वाचा -  ‘आमच्यामधलं प्रेम आजही जिवंत,’ म्हणत तिनं पतीच्या मृत्यूनंतर 11 महिन्यांनी दिला बाळाला जन्म

 फाशीच्या दिवशी काय होतं?

  • फाशीच्या दिवशी कैद्याला आंघोळ करायला सांगून नवीन कपडे घालायला दिले जातात.
  • पहाटे कारागृह अधीक्षकांच्या देखरेखीखाली रक्षक कैद्याला फाशीच्या खोलीत आणतात.
  • फाशीच्या वेळी जल्लादाव्यतिरिक्त तीन अधिकारी उपस्थित असतात.
  • कारागृह अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि दंडाधिकारी हे तीन अधिकारी तिथे असतात.
  • अधीक्षक फाशी देण्यापूर्वी दंडाधिकाऱ्याला कळवतात की, कैद्याची ओळख पटली आहे आणि त्याला मृत्यूचं वॉरंट वाचून दाखवण्यात आलं आहे.
  • डेथ वॉरंटवर कैद्यांच्या सह्या घेतल्या जातात.
  • फाशी देण्यापूर्वी कैद्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते.
  • कैद्याच्या अशाच इच्छा पूर्ण होतात, ज्या जेल मॅन्युअलमध्ये असतात.
  • फाशी देण्याच्या वेळी फक्त जल्लादच दोषीसोबत असतो.

हे वाचा -  दोन ठिकाणी दहशतवादी-सुरक्षा दलात चकमक, अनेक भागात इंटरनेट सेवा ठप्प काय आहे शबनम प्रकरण? उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील बावनखेडी गावात राहणाऱ्या शबनमने तिचा प्रियकर सलीमसोबत मिळून तिच्याच घरातल्या एकूण 7 जणांची हत्या केली होती. 14-15 एप्रिल 2008 च्या रात्री तिने आपल्याच घरात हे हत्याकांड घडवून आणलं. तिने आई-वडील, दोन भाऊ, वहिनी, मावशीची मुलगी आणि निष्पाप लहान मुलाची (भाचा) कुऱ्हाडीने वार करून हत्या केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबनमने हत्या केलेली वहिनी गर्भवती होती. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा झाल्यानंतर राष्ट्रपतींनीही शबनमचा दयेचा अर्ज फेटाळला आहे. आता तिला लवकरच फाशी होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात