जाहिरात
मराठी बातम्या / देश / दक्षिण काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक, अनेक भागात इंटरनेट सेवा ठप्प

दक्षिण काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक, अनेक भागात इंटरनेट सेवा ठप्प

दक्षिण काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक, अनेक भागात इंटरनेट सेवा ठप्प

दक्षिण काश्मीरमध्ये (south Kashmir) दोन ठिकाणी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

श्रीनगर, 09 एप्रिल: दक्षिण काश्मीरमध्ये (South Kashmir) दोन ठिकाणी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. अनंतनागच्या (Anantnag) सिरहामामध्ये पहिली चकमक सुरू आहे, जिथे 1-2 दहशतवादी लपले आहेत. कुलगाम जिल्ह्यातील (Kulgam district) हाजीपोराच्या दमहलमध्ये दुसरी चकमक सुरू आहे, जिथे 2-3 दहशतवादी लपून बसले आहेत. दक्षिण काश्मीरमधील अनेक भागात इंटरनेट बंद करण्यात आलं आहे. लष्करानं सोमवारी सांगितलं की, जम्मू-काश्मीरमध्ये 172 दहशतवादी सक्रिय आहेत. त्यात 79 परदेशी दहशतवादी आहेत. या दहशतवाद्यांमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच दहशतवादात सामील झालेल्या 15 स्थानिक तरुणांचा समावेश असल्याचंही लष्करानं म्हटलं आहे. IPL 2022 : 9 महिन्यांपूर्वीची भविष्यवाणी खरी ठरली, गुजरातच्या खेळाडूची पहिल्याच मॅचमध्ये कमाल    जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्याला सुरक्षा दल चोख प्रत्युत्तर देत आहेत. बुधवारी पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत अन्सार गजवतुल हिंद आणि लष्कर-ए-तैयबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनांच्या दोन दहशतवाद्यांना ठार केलं. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, अंसार गजवातुल हिंदचा सफात मुझफ्फर सोफी उर्फ ​​मुआविया आणि लष्करचा उमर तेली उर्फ ​​तल्हा अशी या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला श्रीनगरमधील खोनमोह भागातील सरपंचाच्या हत्येसह इतर अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये दोघेही वाँटेड होते, असे त्याने सांगितले होते. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवाद्यांनी अलीकडेच त्रालमध्ये तळ बनवला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात