मराठी बातम्या /बातम्या /देश /VIDEO : हिम्मतच कशी झाली! मुलींची छेड काढणाऱ्या तरुणाला खांबाला बांधून दिला चोप

VIDEO : हिम्मतच कशी झाली! मुलींची छेड काढणाऱ्या तरुणाला खांबाला बांधून दिला चोप

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणताही तरूण रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींची छेड काढण्यापूर्वी शंभरदा विचार करतील.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणताही तरूण रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींची छेड काढण्यापूर्वी शंभरदा विचार करतील.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणताही तरूण रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींची छेड काढण्यापूर्वी शंभरदा विचार करतील.

कोलकाता, 10 मार्च : दिवसेंदिवस भररस्त्यात मुलींची छेड काढण्याच्या प्रसंगात वाढ होत आहेत. दिवसाढवळ्या मुलींची छेड काढली जाते. मात्र फार कमी वेळा अशा नराधमांना शिक्षा दिली जाते. बऱ्याचवेळा मुलींची छेड काढून असे आरोपी फरारही होतात. मात्र पश्चिम बंगालमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या एका तरुणाला लोकांना जन्माची अद्दल घडवली.

पश्चिम बंगालमधील बांकुडा येथे एका तरुणाने दारूच्या नशेत काही तरुणांची छेड काढली. मुलींची छेड काढल्यानंतर या तरुणीने पळून जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र लोकांनी त्याला अडवले आणि बेदम मारहाण केली. जमावाने या तरुणाला दोरीने खांबाला बांधून बेदम मारहाण केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणताही तरूण रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींची छेड काढण्यापूर्वी शंभरदा विचार करतील.

वाचा-बाईक नाही म्हणून गर्लफ्रेंडने मारला टोमणा, तिला इम्प्रेस करण्यासाठी त्याने...

वाचा-मानलं पुण्यातल्या रिक्षा चालकाला, 16 लाखांच्या दागिण्यांची बॅग केली परत

वाचा-पाठीला लागली गोळी, तरी जीव वाचवण्यासाठी 3 दिवस झाडाखालीच राहिला पडून आणि...

वाचा-बहिणीला वाचवायला भाऊ धावून आला, माजी सैनिक असलेल्या भावजीने केला गोळीबार

औरंगाबादमध्ये मुलींनी घडवली छेड काढणाऱ्याला अद्दल

औरंगाबादमधील वसुसायगांव येथे मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमियाला चोप दिल्याची घटना घडली होती. शाळकरी मुली घरी जात असताना रस्तावर एका रोडरोमियोने मुलींची छेड काढली. त्यानंतर त्या तरुणाला मुलींनी आणि पालकांनी मिळून चांगलाच चोप दिला. छेडछाडीची माहिती दिल्यानंतर पालक घटनास्थळी हजर झाले आणि सदरील तरुणाला चोप दिला. यावेळी तिथे गावातील लोकांची मोठी गर्दी जमली होती. चोप दिल्यानंतर संबंधित तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. पोलीस याप्रकरणी आता पुढील कारवाई करत आहेत.

First published: