मानलं पुण्यातल्या रिक्षा चालकाला, 16 लाखांच्या दागिन्यांची बॅग केली परत

बराचवेळपासून बॅग एकाच ठिकाणी पडून असल्याने त्यांना संशय आला. यात काही संशयास्पद तर नाही ना असं वाटल्याने त्यांनी ती बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यांना धक्काच बसला.

बराचवेळपासून बॅग एकाच ठिकाणी पडून असल्याने त्यांना संशय आला. यात काही संशयास्पद तर नाही ना असं वाटल्याने त्यांनी ती बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यांना धक्काच बसला.

  • Share this:
    पुणे 10 मार्च : समाजात प्रामाणिकपणाची कायम कमतरता असते असं म्हटलं जातं. मात्र याला काही अपवादही आहेत. पुण्यातल्या दोन रिक्षा चालकांनी याच प्रामाणिकपणाचं उदाहरण घालून दिलं आहे. रिक्षा चालक आणि प्रवासी यांचं नातं कायम हे वादग्रस्तच राहिलं आहे. रिक्षा चालकांच्या लुबाडण्याचे किस्सेही अनेकदा सांगितले जातात असं असलं तरी प्रामाणिकपणा अजुन संपलेला नाही हे पुन्हा एकदा पुढे आलं आहे. रेल्वे स्टेशनवर सापडलेले दागिन्यांची बॅग या रिक्षा चालकांनी पोलिसांकडे दिली. आणि तीच तत्परता दाखवत पोलिसांनी ती बॅग संबंधीत मालका परत केली. सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले दिपक चित्राला हे आंध्र प्रदेशातून पुण्यात आले होते. ते रेल्वे स्टेशनला पोहोचले आणि हडपसरला आपल्या घरी गेले. निघण्याच्या घाईमध्ये त्यांची एक महत्त्वाची बॅग रेल्वे स्टेशनवरच विसरली.  भरत भोसले आणि अतुल टिळेकर या दोन रिक्षा चालकांना ती बॅग आढळली. बराचवेळपासून बॅग एकाच ठिकाणी पडून असल्याने त्यांना संशय आला. यात काही संशयास्पद तर नाही ना असं वाटल्याने त्यांनी ती बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यांना धक्काच बसला. हे वाचा -  पुन्हा पाहायला मिळाली मुंबई पोलिसांची माणुसकी, तुम्हीही कराल सलाम! त्यात एका बॉक्समध्ये सोन्याचे दागिने होते. या दागिन्यांची किंमत सोळा लाख रुपये असल्याची माहिती सांगितली जाते. हे दागिणे कुणा प्रवाशांचे विसरले असावेत हे लक्षात आल्याने दोघांनीही सरळ लोहमार्ग पोलीस स्टेशन गाठले आणि ही बॅग त्यांच्या स्वाधीन केली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनीही संबंधित प्रवाशाचा शोध सुरु केला होता. हे वाचा - दिलासादायक! नाशिकच्या कोरोना कक्षातील पाचवा संशयितही निगेटिव्ह चित्राला हे घरी पोहोचल्यानंतर लगेच त्यांना आपली बॅग विसरल्याचं लक्षात आलं. त्यांनंतर ते सरळ रेल्वे स्टेशनवर आले आणि त्यांनी पोलिसांना माहिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी त्यांची ओळख पटवली आणि ही लाखमोलाची बॅग त्यांच्या स्वाधीन केली. या रिक्षा चालकाचं आणि पोलिसांच्या तत्परतेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.      
    First published: