मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बहिणीला वाचवायला भाऊ धावून आला, माजी सैनिक असलेल्या भावजीने केला गोळीबार

बहिणीला वाचवायला भाऊ धावून आला, माजी सैनिक असलेल्या भावजीने केला गोळीबार

 "तुम्ही येथे कशाला आलात?" असं म्हणत आणि शिवीगाळ करीत आपल्या पिस्तुलमधून गोळ्या झाडत पलायन केलं.

"तुम्ही येथे कशाला आलात?" असं म्हणत आणि शिवीगाळ करीत आपल्या पिस्तुलमधून गोळ्या झाडत पलायन केलं.

"तुम्ही येथे कशाला आलात?" असं म्हणत आणि शिवीगाळ करीत आपल्या पिस्तुलमधून गोळ्या झाडत पलायन केलं.

  • Published by:  sachin Salve
बाळासाहेब काळे, प्रतिनिधी जेजुरी, 10 मार्च : नवरा बायकोच्या भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या  मेव्हण्यावरच जावयाने गोळीबार केल्याची घटना  जेजुरी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या वाघापूर इथं घडली आहे. माजी सैनिक असलेल्या पतीने आपल्या पत्नीला मारहाण करीत भांडण सोडवण्यासाठी आलेल्या आपल्या पत्नीचा भावावर पिस्तुलमधून गोळ्या झाडून जबर जखमी केले. ही घटना रविवारी दिनांक 8 मार्च रात्री ९:१५चे सुमारास घडली. दत्तात्रय रामचंद्र इंदलकर असं (माजी सैनिक) आरोपीचे नाव आहे.  या घटनेत अमोल भगत हा जखमी झाले आहेत. याबाबत सुनीता दत्तात्रय इंदलकर यांनी फिर्याद दाखल केली असून आरोपी दत्तात्रय इंदलकर यास जेजुरी पोलिसांनी शोध घेत ताब्यात घेतले आहे. याबाबत फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दत्तात्रय इंदलकर हा पाच वर्षांपूर्वी लष्करातून निवृत्त झाला होता. त्याने दुसरे लग्न केले असून तो सासवड इथं वास्तव्यास असतात. तर फिर्यादी सुनीता इंदलकर आपल्या दोन मुलांसमवेत सासू सासरे यांच्याबरोबर वाघापूर इथं राहते. आपल्या आई वडिलांना अधून मधून भेटायला आल्यानंतर दत्तात्रय इंदलकर हा नेहमी फिर्यादी सुनीता यांच्याबरोबर वाद घालून मारहाण करून पुन्हा सासवडला निघून जायचा. रविवारी (दि.८) सायंकाळी ७ वाजता दत्तात्रय इंदलकर आई वडिलांना भेटण्यासाठी आल्यानंतर मुलांना सासवडला घेऊन जाण्याचा हट्ट धरला. तर परीक्षा सुरू असल्याने सुनीता यांनी मुलांना नेण्यास नकार दिला. यावेळी दत्तात्रय यांनी दमबाजी, मारहाण करीत पिस्तुल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून जाऊन सुनीता इंदलकर या दोन मुलांना घेऊन घरानजीक शेतात लपल्या आणि तेथून मोबाईल वरून आपल्या भावांशी संपर्क साधला. त्यांचे भाऊ अमोल भगत आणि इतर नातलगांनी तात्काळ इंदलकर मळा गाठला. त्यांना पाहताच दत्तात्रय इंदलकर यांनी "तुम्ही येथे कशाला आलात?" असं म्हणत आणि शिवीगाळ करीत आपल्या पिस्तुलमधून गोळ्या झाडत पलायन केलं. या गोळीबारात अमोल भगत जखमी झाले. त्यांना फिर्यादी आणि इतर नातलगांनी उपचारासाठी जेजुरी येथील खाजगी रुग्णालयात आणि तेथून पुणे येथे हलविण्यात आलं. जेजुरी पोलिसांनी तात्काळ भा.द.वि. कलम ३२३,५०४५०६,शस्त्र प्रतिबंधक कायदा ३अन्वये गुन्हा दाखल करीत आरोपी  दत्तात्रय इंदलकर यास शोध घेऊन ताब्यात घेतले.त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .सहा. पोलीस निरीक्षक अंकुश माने पुढील तपास करीत आहेत .
First published:

Tags: Crime, Fire, Jejuri

पुढील बातम्या