मराठी बातम्या /बातम्या /देश /

बाईक नाही म्हणून गर्लफ्रेंडने मारला टोमणा, तिला इम्प्रेस करण्यासाठी त्याने...

बाईक नाही म्हणून गर्लफ्रेंडने मारला टोमणा, तिला इम्प्रेस करण्यासाठी त्याने...

गर्लफ्रेंडचा शब्द त्याच्या इतका जिव्हारी लागला की, त्याने हे पाऊल उचललं

गर्लफ्रेंडचा शब्द त्याच्या इतका जिव्हारी लागला की, त्याने हे पाऊल उचललं

गर्लफ्रेंडचा शब्द त्याच्या इतका जिव्हारी लागला की, त्याने हे पाऊल उचललं

    नवी दिल्ली, 10 मार्च : 'व्हॅलेंटाइन्स डे' (14 फेब्रुवारी ) हा प्रेमाचा दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. यादिवशी प्रियकर-प्रेयसी आनंदात दिवस साजरा करतात. मात्र दिल्लीतील एका प्रियकराला या दिवशी प्रेयसीचा शब्द जिव्हारी लागला आहे. यातून त्याने चोरीचा सपाटा लावल्याची बाब समोर आली आहे. ही घटना दिल्लीतील असून ललित असं त्या प्रियकराचं नाव आहे. व्हॅलेंटाइन्सच्या दिवशी ललित प्रेयसीला भेटायला गेला होता. प्रेयसीला फिरायला घेऊन जाण्यासाठी त्याच्याकडे इतर तरुणांप्रमाणे बाईक नव्हती. यावर प्रेयसीने त्याला टोमणा मारला होता. हा टोमणा ललितच्या जिव्हारी लागला. या रागातून ललितने प्रेयसीवर छाप पाडण्यासाठी बाईक चोरण्याचा सपाटाच सुरू केला. 'इंडिया टुडे' या वृत्त माध्यमाने ही बातमी दिली आहे. बाईक चोरण्यासंदर्भात आधी ललितने त्याच्या मित्रांशी चर्चा केली आणि प्लान ठरवला. दिल्लीच्या ठराविक भागांमध्ये बाईक चोरीच्या घटना वाढल्याचे दिल्ली पोलिसांच्या लक्षात आले, यावरुन पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. 6 मार्चला बाईकची चोरी होण्याची माहिती पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली होती. यानुसार पोलिसांनी चोरांना पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांना बाईकवरुन जाताना दोघेजण दिसले. त्यांच्या बाईकला नंबर प्लेट नव्हती. यावरुन पोलिसांना संशय आला व त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. ललितच्या मित्रांनी या प्रकरणाचा खुलासा केला. प्रेयसीने मारलेला टोमणा जिव्हारी लागल्याने ललितने हे पाऊल उचलले होते. तिला इम्प्रेस करण्यासाठी त्याने बाईक चोरल्याची माहिती पोलिसांना दिली. हे वाचा - मानलं पुण्यातल्या रिक्षा चालकाला, 16 लाखांच्या दागिण्यांची बॅग केली परत
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bike, Bike thief, Girlfriend

    पुढील बातम्या