पाठीला लागली गोळी, तरी जीव वाचवण्यासाठी 3 दिवस झाडाखालीच राहिला पडून आणि...

भिंतीवरुन उडी मारत असताना त्याच्या पाठीला गोळी लागली आणि तो जागीच कोसळला

भिंतीवरुन उडी मारत असताना त्याच्या पाठीला गोळी लागली आणि तो जागीच कोसळला

  • Share this:
    नवी दिल्ली, 10 मार्च : राजधानी नवी दिल्लीतील नरेका भागात डीडीए कन्स्ट्रक्शन साईटवर चोरी करण्याच्या हेतूने आलेल्या व्यक्तीला गार्डने गोळी मारली. ही गोळी त्याच्या  पाठीला लागली. मात्र घाबरुन तो तीन दिवस झाडांच्या आडोशाला तसाच पडून होता. त्या दिवशी रात्री 11 वाजता चोरी करण्यासाठी दोघेजण बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत शिरले. त्यादरम्यान गार्डने चोरांना पाहून आरड़ाओरडा सुरू केला. डीडीए कन्स्ट्रक्शनच्या साईटवर कोणी तरी चोर आल्याचे गार्डच्या लक्षात आले होते. त्याने अंदाजाने गोळी झाडली. नेमकी ही गोळी चोराच्या पाठीवर लागली व तो जागीच कोसळला. आता आपण पकडले जाऊ या भीतीने तो जिथे होता तिथेच पडून राहिला. तब्बल तीन दिवस तो चोर जीव वाचविण्यासाठी तेथेच जखमी अवस्थेत पाठीवरील गोळीसह थांबून राहिला. या तरुणाचे नाव अमित असे आहे. अमितच्या कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार तो पाच दिवसांपासून घरी आला नव्हता. त्याला अमली पदार्थांचं व्यसनं आहे. यापूर्वी दोन वेळा तो चोरीच्या प्रकरणात तुरुंगात गेला आहे. अमित पळून जाण्यासाठी भिंतीवरुन उडी मारू लागला असताना गार्डने हवेत गोळी झाडली. ती गोळी नेमकी अमितच्या पाठीला लागली. तो जवळील झाडांमध्ये लपून बसला. यावेळी त्याच्यासोबत असलेला मित्रही त्याला त्याच अवस्थेत सोडून निघून गेला. मित्रानेही याबाबत कोणाकडेच वाच्यता केली नाही. रविवारी अमितला रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्व घटना स्पष्ट झाली. पोलिसांकड़ून याबाबत तपास केला जात आहे. हे वाचा - दिलासादायक! नाशिकच्या कोरोना कक्षातील पाचवा संशयितही निगेटिव्ह
    First published: