मुखमंत्री ममता 2019 मध्ये दिघातील दत्तपूरमध्ये प्रशासकीय भेटीवर गेल्या असतानाही त्यांनी तिथल्या चहावाल्या टपरीवर चहा करून तो सर्वांना दिला होता. ‘कधीकधी छोटीशी कामं पण आपल्याला आनंद देतात. मस्तपैकी चहा तयार करून तो सर्वांना देणं हा त्यापैकीच एक आनंद. आज दत्तपूर दिघामध्ये.’ अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.Chai pe charcha! @MamataOfficial at a tea stall in Nandigram this evening! pic.twitter.com/eb0RuL8fbG
— Poulomi Saha (@PoulomiMSaha) March 9, 2021
या दोन दिवसांच्या दौऱ्यात ममतांनी घेतलेल्या सभेत सुवेंदू अधिकारी यांचं नाव न घेता जोरदार टीका केली. त्या एका जाहीर सभेत म्हणाल्या, ‘बाहेरून गुजरातमधून आलेल्यांकडे आपला ईमान विकणारे धर्माचं राजकारण करून नंदिग्राममधील आंदोलनाला बदनाम करत आहेत. नंदिग्रामची जनता तृणमूलच्या पाठीशी आहे ती त्यांना जागा दाखवेल.’ (हे वाचा-महाराणा प्रतापांची प्रतिमा पदाधिकाऱ्यांच्या पायाशी,भाजपच्या कार्यक्रमातील प्रकार) दरम्यान ममता बॅनर्जी नंदिग्रामच्या नाहीत बाहेरच्या आहेत या आरोपाचंही त्यांनी खंडन केलं. त्या म्हणाल्या, ‘ विरोधक म्हणतात मी नंदिग्रमामध्ये बाहेरून आले. माझा जन्म आणि उभं आयुष्य शेजारच्या बीरभूम जिल्ह्यात गेलं आणि मिदनापूर जिल्ह्यात जन्मलेली व्यक्ती म्हणते मी बाहेरून आले. मी अवाकच झाले. आता मी बाहेरची झाले आणि गुजरातेतून बंगालमध्ये आलेले लोक बंगालमधले झाले आहेत. ’ नंदिग्राम आंदोलनमध्ये आघाडीवर असलेले ममतांचे खंदे समर्थक सुवेंदू अधिकारी काही दिवसांपूर्वी भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे नंदिग्राम विधानसभेत सुवेंदू विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशी हाय प्रोफाईल लढत होणार आहे. 10 मार्च हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून नंदिग्राममध्ये दुसऱ्या टप्प्यात 1 एप्रिल 2021 ला मतदान होणार आहे. 2 मे 2021 ला निकाल जाहीर होईल. (हे वाचा-Red Fort Violence: दिल्ली हिंसा प्रकरण; विदेशी नागरिकासह दोघं अटकेत) चंडीपाठ हे स्रोत्र म्हणून दाखवत ममतादीदींनी सर्वांना आश्चर्यचकित करून टाकलं. त्या म्हणाल्या,‘ मी दररोज घरातून बाहेर पडताना चंडीपाठ करूनच बाहेर पडते. भाजपने माझ्याविरुद्ध हिंदू कार्डाचा वापर करू नये. ’ ममतादीदींनी चंडी मंदीर आणि शमशाबाद मजारला भेट देऊन तिथे प्रार्थना केली. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान होणार असून 27 मार्चला पहिल्या टप्प्याचं तर 29 एप्रिलला शेवटच्या टप्यातलं मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 2 मेला जाहीर होईल.Sometimes the little joys in life can make us happy. Making and sharing some nice tea (cha/chai) is one of them. Today, in Duttapur, Digha | কখনো জীবনের ছোট ছোট মুহূর্ত আমাদের বিশেষ আনন্দ দেয়। চা বানিয়ে খাওয়ানো তারমধ্যে একটা। আজ দীঘার দত্তপুরে। #Bangla pic.twitter.com/cC1Bo0GuYy
— Mamata Banerjee (@MamataOfficial) August 21, 2019
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election 2021, BJP, Mamata banerjee, PM narendra modi, TMC, West bengal