मराठी बातम्या /बातम्या /देश /Red Fort Violence: दिल्ली हिंसा प्रकरण; विदेशी नागरिकासह दोघं अटकेत

Red Fort Violence: दिल्ली हिंसा प्रकरण; विदेशी नागरिकासह दोघं अटकेत

26 जानेवारील दिल्लीच्या लाल किल्ला हिंसा प्रकरणी (Red Fort Violence) पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांमधील एक मनजिंदर जीत सिंग हा डच नागरिक आहे.

नवी दिल्ली 10 मार्च : 26 जानेवारील दिल्लीच्या लाल किल्ला हिंसा प्रकरणी (Red Fort Violence) पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी मोठा गुन्हेगार आहे. या दोघांनीही लाल किल्ला हिंसेवेळी पोलिसांवर हल्ला केला होता. अटक करण्यात आलेल्या दोघांमधील एक मनजिंदर जीत सिंग हा डच नागरिक आहे. तो ब्रिटनमध्ये राहातो. या आरोपीला दिल्ली विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीत सिंग खोट्या कागदपत्रांच्या आधारे विदेशात पळ काढण्याच्या तयारीत होता.

अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीचं नाव खेमप्रीत सिंग असं आहे. या आरोपीनंही पोलिसांवर हल्ला केला होता. या घटनेनंतर खेमप्रीत सिंग फरार होता. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांनी यश आलं आहे.

देशाच्या राजधानीमध्ये 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं (Farmers Protest) आयोजन केलं होतं. मात्र, या आंदोलनाला पुढे हिंसक वळण (Violence in tractor rally) प्राप्त झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी तर पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये हिंसा झाली. मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही अखेर आंदोलनकर्ते लाल किल्ल्यामध्येही घुसले होते. यानंतर या हिंसेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी याप्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. याप्रकरणी आतापर्यंत अनेकांनी ताब्यात घेण्यात आलं आहे.

First published:
top videos

    Tags: Farmer protest, India, Red fort, Red fort delhi, Violence