Home /News /national /

महाराणा प्रतापांची प्रतिमा पदाधिकाऱ्यांच्या पायाशी, भाजपच्या कार्यक्रमातील धक्कादायक प्रकार

महाराणा प्रतापांची प्रतिमा पदाधिकाऱ्यांच्या पायाशी, भाजपच्या कार्यक्रमातील धक्कादायक प्रकार

भाजपच्या कार्यक्रमात मंचावर बसलेले पदाधिकारी आणि गौरवार्थींच्या पायांजवळ महाराणा प्रतापांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे राजस्थानात वादंग निर्माण झाला आहे.

    कपिल श्रीमाली, उदयपूर, 10 मार्च: राजस्थानातील वल्लभनगर (Vallabhnagar) विधानसभा मतदारसंघात भाजपच्या (BJP) एका युवक संमेलनात प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया (Satish Poonia) यांच्या हस्ते तरुणांना वीर शिरोमणी महाराणा प्रतापांच्या (Maharana Pratap) प्रतिमा देण्यात आल्या. त्या स्वीकारल्यानंतर मंचावर बसलेल्या पदाधिकारी आणि गौरवार्थींच्या पायांजवळ त्या प्रतिमा ठेवण्यात आल्या. त्यामुळे राजस्थानात वादंग निर्माण झाला आहे. यानंतर भाजपने महाराणा प्रतापांचा अपमान केला असल्याचा आरोप सोशल मीडियावर होत आहे. या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष पूनिया उपस्थित असताना असं घडल्यामुळे तर विरोधाला अजून धार चढली. मग राज्यातील सत्ताधारी काँग्रेस आणि मेवाड अंचलमधील लोक आणि जनता सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्यानंतर भाजप नेत्यांनी जाहीरपणे जनतेची माफी मागितली तरीही प्रकरण शांत होण्याचं नाव घेत नव्हतं. महाराणा प्रताप यांचा अपमान सहन केला जाणार नाही असं म्हणत ऑनलाइन कँपेन चालवलं गेलं आणि सोशल मीडियावरही भाजपला जोरदार ट्रोल केलं गेलं. त्यानंतर राज्य भाजपच्या अधिकृत फेसबूक पेजवरून याबाबत माफी मागण्यात आली आहे. ‘महाराणा प्रताप संपूर्ण भारतवर्षासाठी आदरणीय आणि अभिमान वाटावं असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याबद्दल आपणा सर्वांच्याच मनात प्रचंड आदर आहे. आमच्या चुकीबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो.’ हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांकडून ही चूक झाल्याचं स्पष्टीकरणही फेसबूक पानावर भाजपच्या प्रदेशाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलं आहे. (हे वाचा-हरयाणातील भाजपा सरकार वाचणार की जाणार? मुख्यमंत्री खट्टर यांच्या टेन्शनमध्ये वाढ) सोशल मीडियावर अशी उमटली प्रतिक्रिया सोशल मीडियावर भाजपच्या युवा संमेलनाचा फोटो प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या. हा राजस्थानचा, मेवाडचा अपमान आहे असं अनेकांनी म्हटलं. भाजपला सत्तेचा अहंकार आला आहे असं राजकीय पक्षाच्या नेत्यांनी म्हणत निषेध केला. सामाजिक संघटनांनीही जोरदार विरोध केला. सी. पी. जोशींकडून माफी राजस्थानमधील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि खासदार सी. पी. जोशी (C. P. Joshi) यांनी सर्वांत पहिल्यांदा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करून जनतेची जाहीर माफी मागितली. नकळतपणे ही चूक झाली आहे त्याबद्दल आम्ही जनतेची माफी मागतो असं त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. (हे वाचा-सेक्स सीडी प्रकरण: रमेश जारकीहोळी म्हणाले, 'महानायका'नं यात अडकवलं) वल्लभनगरची पोटनिवडणूक सध्या राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं सरकार आहे. वल्लभनगर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपने केलेली ही चूक काँग्रेसच्या पथ्यावर पडली आणि त्यांनी त्याचा जबरदस्त फायदा घेतला. देशात सत्तेत असलेल्या भाजपला अहंकार झाला असून त्यामुळेच ते वीरपुरुषांचा अपमान करत आहेत अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. वल्लभनगर विधानसभा निवडणुकीवर या घटनेचा किती परिणाम होतो हे बघावं लागेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: India, Rajasthan

    पुढील बातम्या