मराठी बातम्या /बातम्या /देश /इथे भाड्याने पोलीस मिळतील; इतक्या हजारात संपूर्ण पोलीस ठाणं करता येतं बुक

इथे भाड्याने पोलीस मिळतील; इतक्या हजारात संपूर्ण पोलीस ठाणं करता येतं बुक

केरळमध्ये पोलिसांना भाड्याने ठेवले जाते. तुम्हाला फक्त पोलीस भाड्याने घेण्यासाठी ठरलेली रक्कम मोजावी लागेल. एवढंच नाही तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही संपूर्ण पोलीस स्टेशन भाड्याने घेऊ शकता (Police on Rent)

केरळमध्ये पोलिसांना भाड्याने ठेवले जाते. तुम्हाला फक्त पोलीस भाड्याने घेण्यासाठी ठरलेली रक्कम मोजावी लागेल. एवढंच नाही तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही संपूर्ण पोलीस स्टेशन भाड्याने घेऊ शकता (Police on Rent)

केरळमध्ये पोलिसांना भाड्याने ठेवले जाते. तुम्हाला फक्त पोलीस भाड्याने घेण्यासाठी ठरलेली रक्कम मोजावी लागेल. एवढंच नाही तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही संपूर्ण पोलीस स्टेशन भाड्याने घेऊ शकता (Police on Rent)

तिरुअनंतपुरम 13 ऑगस्ट : भारतातील सीमांच्या रक्षणासाठी लष्कर तैनात केले जातात. त्याचबरोबर देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी राज्यांमध्ये पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसात भरती होण्यासाठी तरुण रात्रंदिवस मेहनत करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, असं एक राज्य आहे जिथे पोलीस भाड्याने मिळतात. हे ऐकायला विचित्र वाटेल पण हे अगदी खरं आहे. नुकतंच यासंबंधीचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे.

काश्मीरमध्ये आत्मघातकी हल्ला तर दिल्लीत घातपात, 15 ऑगस्टआधी 5 मोठ्या घडामोडी

केरळमध्ये हा अजब नियम आहे. यावरून सध्या वाद सुरू आहे. जुन्या नियमानुसार, केरळमध्ये पोलिसांना भाड्याने ठेवले जाते. तुम्हाला फक्त पोलीस भाड्याने घेण्यासाठी ठरलेली रक्कम मोजावी लागेल. एवढंच नाही तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही संपूर्ण पोलीस स्टेशन भाड्याने घेऊ शकता. केरळमध्ये तुम्ही एका दिवसासाठी 700 रुपयांमध्ये कॉन्स्टेबल भाड्याने घेऊ शकता. एका इन्स्पेक्टरसाठी तुम्हाला 2560 रुपये द्यावे लागतील. तर, संपूर्ण पोलीस स्टेशन भाड्याने घेण्यासाठी तुम्हाला 33100 रुपये मोजावे लागतील.

अलीकडेच हे प्रकरण चर्चेत आलं जेव्हा कुन्नूरचे के. अन्सार यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी व्हीआयपी सुरक्षेच्या नावाखाली 4 कॉन्स्टेबल नेमले. विशेष म्हणजे या लग्नात एकही व्हीव्हीआयपी पोहोचला नाही. यानंतर केरळच्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी या नियमाला विरोध केला. एवढंच नाही तर केरळ पोलीस असोसिएशनने सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणी आपला विरोध व्यक्त केला आहे. पोलीस असोसिएशनचे म्हणणं आहे की केरळ पोलीस कायद्याच्या कलम 62(2) नुसार, कोणीही पोलिसांवर वैयक्तिक वापरासाठी सक्ती करू शकत नाही.

Terrorist Attack: रक्षाबंधनच्या दिवशी दहशतवाद्यांशी लढताना 3 जवानांना वीरमरण, कुटुंबावर दुखाचा डोंगर

केरळमध्ये पोलीस भाड्याने घेण्यासाठी वेगवेगळे दर चार्ट आहेत. दराची कामानुसार यादी तयार करण्यात आली आहे. चित्रपटाचे शूटिंग, लग्न समारंभ, वैयक्तिक सुरक्षा यासाठी रँकनुसार दर निश्चित केले जातात. उदाहरणार्थ, सीआय रँक ऑफिसरला भाड्याने ठेवण्यासाठी एका दिवसासाठी 3795 रुपये आणि एका रात्रीसाठी 4750 रुपये शुल्क द्यावे लागते. त्याचप्रमाणे, एसआयसाठी दिवसासाठी 2560 रुपये आणि रात्रीसाठी 4360 रुपये निश्चित केले आहेत. दुसरीकडे, कोणी पोलिसांकडील डॉगचीही मागणी केली तर त्याला 6950 द्यावे लागतात.

First published:

Tags: Kerala, Police