मराठी बातम्या /बातम्या /देश /काश्मीरमध्ये आत्मघातकी हल्ला तर दिल्लीत घातपात, 15 ऑगस्टआधी 5 मोठ्या घडामोडी

काश्मीरमध्ये आत्मघातकी हल्ला तर दिल्लीत घातपात, 15 ऑगस्टआधी 5 मोठ्या घडामोडी

स्वातंत्र्यदिनाआधी मोठी कारवाई! काश्मीर ते दिल्ली आत्मघातकी हल्ला ते घातपात;  15 ऑगस्टआधी 5 मोठ्या घडामोडी

स्वातंत्र्यदिनाआधी मोठी कारवाई! काश्मीर ते दिल्ली आत्मघातकी हल्ला ते घातपात; 15 ऑगस्टआधी 5 मोठ्या घडामोडी

स्वातंत्र्यदिनाआधी मोठी कारवाई! काश्मीर ते दिल्ली आत्मघातकी हल्ला ते घातपात; 15 ऑगस्टआधी 5 मोठ्या घडामोडी

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाची तयारी मोठ्या जल्लोषात सुरू आहे. तर दुसरीकडे देशाच्या सुरक्षेला धक्का पोहोचवणाऱ्या घातपाताचा कट उधण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. 15 ऑगस्टआधी जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी गोळीबार झाला. तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी मोठा कट उधळून लावला आहे. काश्मीरपासून दिल्लीपर्यंत 5 मोठ्या घडामोडी घडल्या.

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा जवानांना मोठं यश मिळालं आहे. दहशतवाद्यांचे नापाक इरादे उधळून लावण्यात जवान यशस्वी ठरले आहेत. राजौरीपासून 25 किमी अंतरावर असलेल्या जवानांच्या कॅप्मवर हल्ला करण्यात आला.

दिल्लीमध्ये पोलिसांनी 15 ऑगस्टआधी मोठा घातपाताचा कट उधळला आहे. पोलिसांना 2 हजार जिवंत काडतुसं सापडली आहेत. ही काडतुसं पुरवणाऱ्या 6 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आनंद विहार भागातून 6 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 2 बॅग भरून काडतुसं ताब्यात घेतली आहेत.

ही काडतुसं कुठून आणली आणि नेमका काय कट होता याची कसून चौकशी पोलीस करत आहेत. 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीतील सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे.

देशाची राजधानी दिल्लीत १५ ऑगस्टपूर्वी २ हजार जिवंत काडतुसे सापडली आहेत. यासोबतच दिल्लीत काडतुसे पुरवणाऱ्या ६ आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. पूर्व दिल्ली पोलिसांनी पुरवठादाराला आनंद विहार परिसरातून 2 बॅगांसह अटक केली आहे. आता हे लोक ही ५० हजार काडतुसे कोठून पुरवठा करणार होते, असा सवाल पोलिसांकडून केला जात आहे. तसेच ते कुठे वापरायचे?

दुसरीकडे जम्मू काश्मीरच्या गुरुवारी राजौरी परिसरात आत्मघातकी हल्ला करण्यात आला. यामध्ये तीन जवान शहीद झाले. तर जवानांनी या हल्ल्याला प्रतिउत्तर दिलं असून त्यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही घटना राजौरीमध्ये घडली.

यावेळी गोळीबार देखील करण्यात आला. जम्मू काश्मीरमध्ये गोळीबार सुरू आहे. तर जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. त्यामुळे तिथल्या पोलीस आणि ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टीसीयू जम्मू/श्रीनगर/रामबन या मार्गावरून जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Delhi Police, Independence day, Jammu kashmir