• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • VIDEO कोल्हापुरात महिलांनी खासदारांसमोरच घेतल्या नदीत उड्या

VIDEO कोल्हापुरात महिलांनी खासदारांसमोरच घेतल्या नदीत उड्या

या महिलांची भेट घेण्यासाठी खासदार धैर्यशील माने आले होते. माने हे महिलांशी चर्चा करत असतानाच संतप्त झालेल्या काही महिलांनी थेट नदीपात्रातच उड्या घेतल्या.

  • Share this:
कोल्हापूर 03 जानेवारी : बचत गटातल्य महिलांनी घेतलेलं कर्ज माफ व्हावं यासाठी कोल्हापुरमध्ये महिलांनी आंदोलन पुकारलंय. या महिलांना मायक्रोफायनान्स या कंपनीने कर्ज दिलं होतं. पण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे या भागातल्या महिलांचे संसार उघड्यावर पडले, शेती उद्धवस्त झाली मोठं आर्थिक नुकसान झालं. त्यामुळे या महिलांना त्यांचं ते कर्ज फेडणं शक्य झालं नाही. शेतकऱ्यांना जशी कर्जमाफी मिळाली तशीच कर्जमाफी आम्हालाही मिळावी अशी मागणी या महिलांनी केलीय. त्यासाठी बचत गटाच्या महिला पंचगंगा नदीच्या काढावर आंदोलनाला बसल्या होत्या. त्याच दरम्यान महिलांनी हे टोकाचं पाऊल उचललं. गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या या महिलांची भेट घेण्यासाठी खासदार धैर्यशील माने आले होते. माने हे महिलांशी चर्चा करत असतानाच संतप्त झालेल्या काही महिलांनी थेट नदीपात्रातच उड्या घेतल्या. कर्जमाफी द्या नाही आम्ही नदीच्या पाण्यात जीवाचं बरं वाईट करतो असं त्या सांगत होत्या. महिलांच्या या पावित्र्यामुळे तिथे एकच खळबळ उडाली. खासदार माने यांच्यासह तिथं असलेल्या पोलीस आणि प्रशासनाची एकच धावपळ उडाली. तिथे जमलेल्या सगळ्यांनी पाण्यात पडलेल्या महिलांना उचलत त्यांना बाहेर आणलं आणि त्यांची समजूत घातली. या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी शक्यते सर्व प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिलं. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचंही ते म्हणाले. कोल्हापुरातल्या  महापुरात तब्बल 9000 जनावरांचा मृत्यू झाला होता.  मृत्यू झालेल्या जनावरांमध्ये बहुतांश जनावर दुभती आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांसाठी हे सर्वात मोठं नुकसान होतं. शेतकऱ्यांचं हे नुकसान लक्षात घेत या दोन्ही जिल्ह्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना गाई आणि म्हशी दान देण्याससाठी अनेक जण सरसावले आहेत. या विशेष मदतीमुळे दोन्ही जिल्ह्यातील दूध विक्रेत्यांना फायदा होईल अशी अपेक्षा होती.
Published by:Ajay Kautikwar
First published: