पॉर्न बघण्याच्या नशेत हिंसक होत आहेत भारतातील तरुण, धक्कादायक आकडेवारी समोर

पॉर्न बघण्यामुळे लोक हिंसक होत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 3 जानेवारी : मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरानंतर देशात पॉर्न बघणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच पॉर्नबाबत (pornography ) एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशातील 3 कोटी लहान मुलं तर 7 कोटी मोठ्या वयोगटातील व्यक्ती पॉर्न बघण्यामुळे हिंसक होत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.

पॉर्न बघण्यामुळे लोक हिंसक होत चालले आहेत आणि त्यातूनच मग समाजात गुन्हेगारी वाढत आहे. वकील कमलेश वासवानी यांनी सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही आकडेवारी दिली आहे. 'देशातील 3 कोटी लहान मुलं तर 7 कोटी मोठ्या वयातील व्यक्ती पॉर्नच्या व्यसनाचे शिकार आहेत. त्यामुळे समाजातील हिंसकता वाढत आहे,' अशी माहिती कोर्टात सादर करण्यात आली. त्यामुळे लवकरात लवकर हे थांबवण्यासाठी कारवाई करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

VIDEO पाहून तुमचीही मान शरमेने खाली जाईल! महिला इमारतीवरून उडी मारत होती आणि...

सुप्रीम कोर्टाने बंदी घातल्यानंतरही भारतात इंटरनेटवर पॉर्नोग्राफीशी संबंधित कंटेट उपलब्ध आहे. वेबसीरिजद्वारेही भारतात सेक्स आणि हिंसेसंदर्भात कंटेट दाखवला जात आहे, असा दावा वकील कमलेश वासवानी यांनी सुप्रीम कोर्टात केला आहे. हैदराबाद इथं झालेल्या सामुहिक बलात्काराचाही वासवानी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला आहे.

'पॉर्न व्हिडिओ बघण्याची सवय ही दारू आणि ड्रग्जसारखी आहे. इंटरनेटवर ऑनलाईन स्ट्रीमिंगद्वारे करोडो रुपयांची कमाई केली जात आहे. वेबसीरिजमध्ये सेक्स संबंधित कंटेटचा वापर केला जात आहे. याबाबत कोणतेही नियम करण्यात आलेले नाहीत. यासारख्या कंटेंटमुळे वेश्याव्यवसायही वाढत चालला आहे. त्यामुळे पॉर्नोग्राफी आणि चाइल्ड पॉर्नोग्राफी रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आधीच्या निर्णयाची अंबलबजावणी करण्याची आवश्यकता आहे,' असं वासवानी यांनी म्हटलं आहे.

'मी 2013 सालीच कोर्टात एक याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये म्हटलं होतं की इंटरनेटसंदर्भातील कायद्याअभावी पॉर्न व्हिडिओला प्रोत्साहन मिळत आहे. अगदी सहजरित्या लहान मुलांपर्यंत हा कंटेंट पोहोचत आहे. त्यामुळे त्यांच्या बुद्धीमत्तेवर विपरीत परिणाम होत आहे,' असं कमलेश वासवानी यांनी कोर्टात म्हटलं. दरम्यान, पॉर्न वेबसाइट्सवर बंदी घालण्याबाबत सुप्रीम कोर्टाने 2016 साली निर्णय दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 3, 2020 04:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading