Home /News /national /

व्हॅलेंटाईन डेला रेस्टॉरंट आणि हुक्काबारमध्ये भाजप-शिवसेनेकडून तोडफोड

व्हॅलेंटाईन डेला रेस्टॉरंट आणि हुक्काबारमध्ये भाजप-शिवसेनेकडून तोडफोड

भारतीय जनता युवा मोर्चाने (BJYM) श्यामला हिल्स भागात असलेल्या हुक्का बार लाँजवर तोडफोड केली, तर अरेरा कॉलनी परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी बेफाम वागणूक केली.

  भोपाळ, 15 फेब्रुवारी : रविवारी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी भोपाळच्या एका रेस्टॉरंट आणि एका हुक्का बारमध्ये तोडफोड करण्यात आली. भाजपचे कार्यकर्ते असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भोपाळच्या रेस्टॉरंटमध्ये आणि हुक्का बारमध्ये तोडफोड केली. भारतीय जनता युवा मोर्चाने (BJYM) श्यामला हिल्स भागात असलेल्या हुक्का बार लाँजवर तोडफोड केली, तर अरेरा कॉलनी परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी बेफाम वागणूक केली. मालमत्तेच्या नुकसानाव्यतिरिक्त या दोन गटांनी दोन्ही ठिकाणी उपस्थित असलेल्या ग्राहक, रेस्टॉरंट आणि हुक्का बारमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांशीही गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अरेरा कॉलनी परिसरातील या गटामध्ये तीन महिलांचा समावेश होता. हबीबगंज आणि श्यामला हिल्स पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालमत्ता तोडफोड आणि दंगा केल्याप्रकरणी दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. व्हॅलेंटाईन डेला झालेल्या या प्रकरणात भाजपचे माजी आमदार सुरेंद्रनाथ सिंह यांच्यासह इतर 17 जणांना अटक करण्यात आली आहे.

  (वाचा - 8 दिवसांच्या जुळ्या बहिणींना माकडांनी उचलून नेलं; नाल्यात फेकल्याने एकीचा दुर्देवी मृत्यू)

  View this post on Instagram

  A post shared by Firstpost (@firstpost)

  भारतीय जनता युवा मोर्चाचे लिडर अमित राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, लव्ह जिहाद आणि तरुण मुलींना ड्रग्ज देणाऱ्या हुक्का बारला सावध करण्यासाठी संपूर्ण शहरात हल्लाबोल केला जात असल्याचं सांगितलं. तसंच भाजपचे माजी आमदार सुरेंद्रनाथ सिंग यांच्या आवाहनानंतर रविवारी हा हल्लाबोल केला. ही एक सुरुवात आहे. हुक्का बार बंद न केल्यास अधिक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Attack on hookah bar, Bhopal News, BJP, Modi government, PM narendra modi, Shivsena

  पुढील बातम्या