Home /News /national /

हॉस्पिटलच्या Tolietमध्ये डिलिव्हरी, कमोडमध्ये अडकलं नवजात; बाळाचे पाय पकडून रडत राहिले वडील

हॉस्पिटलच्या Tolietमध्ये डिलिव्हरी, कमोडमध्ये अडकलं नवजात; बाळाचे पाय पकडून रडत राहिले वडील

एका प्रेग्नेंट (Pregnant Woman) महिलेची डिलिव्हरी टॉयलेटमध्ये झाली आहे.

    उत्तर प्रदेश, 15 ऑक्टोबर: कानपूरच्या (Kanpur) हॅलट हॉस्पिटलमधली निष्काळजीपणाची एक मोठी घटना उघडकीस आली आहे. येथे एका प्रेग्नेंट (Pregnant Woman) महिलेची डिलिव्हरी टॉयलेटमध्ये झाली आहे. धक्कादायक म्हणजे टॉयलेटच्या शीटमध्ये (toilet sheet) अडकून नवजात बाळाचा मृत्यू (newborn child died) झाला आहे. महिलेच्या पतीनं आरोप केला आहे की, रात्री पत्नीला लेबर पेन सुरु झाले होते. मात्र डॉक्टर किंवा नर्सनी लक्ष दिलं नाही, त्याच दरम्यान पत्नी टॉयलेटला गेली तर तिथे तिची डिलिव्हरी झाली. हेही वाचा- Tinder वरील मित्रानं केला विश्वासघात; पुण्यातील IT अभियंता तरुणीला 73 लाखांना फसवलं  हॅलट हॉस्पिटलमध्ये बुधवारी रात्री मोबिनची पत्नी हसीना बानो हिला ताप आल्यानं तिला दाखल करण्यात आलं होतं. हसीना आठ महिन्यांची प्रेग्नेंट होती. रात्री तिला लेबर पेन सुरु झाले. ही आमची केस नाही असं सांगून वॉर्डच्या नर्संनी तिला डिलिव्हरी वॉर्डमध्ये दाखल करण्यास नकार दिला. मात्र तरीही हसीना यांचं कुटुंब नर्सना विनंती करत होतं. याचवेळी हसीना टॉयलेटला गेली. जेथे टॉयलेटच्या शीटवर तिची डिलिव्हरी झाली आणि तिचा नवजात बाळ टॉयलेट शीटच्या सीवर लाईनमध्ये अडकला. मोबिननं आरोप केला की, जन्म झाला तेव्हा माझं बाळ जिवंत होतं. मात्र इमरजन्सी डॉक्टर आणि स्टाफ येऊन शीट तोडून बाळाला बाहेर काढेपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता. हेही वाचा- IPL 2021 Final: धोनी सर्वात मोठ्या खेळाडूला संधी देणार का? अशी असेल CSK ची Playing 11  या घटनेतील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे मोबिन यावेळी नवजात बाळाचे पाय पकडून टॉयलेट शीटवर उभं राहून त्याला वाचवण्यासाठी गयावया करत रडत होता. पण तरीही त्याला आपल्या मुलाला वाचवता आलं नाही. मोबिननं सांगितलं की, टॉयलेट शीटमध्ये बाळाचं तोंड अडकलं होतं. जिथे गटाराचं पाणी साचलं होतं. बाळाला काढण्यासाठी इतका उशीर झाला की, ज्यात त्याचा मृत्यू झाला. मोबिननं वरून बाळाचे पाय धरले होते आणि मदतीसाठी हाक मारली होती. मदत न मिळाल्यानं कुटुंब हॅलट हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. इमरजन्सीमध्ये ईएमओ आणि अन्य स्टाफ वॉर्डमध्ये एकत्र पोहोचले. नवजात मुलाला काढण्याचा प्रयत्न केला पण यश न आल्यानं टॉयलेटची शीट तोडली. मात्र नवजात बाळाला टॉयलेटमधून बाहेर काढेपर्यंत त्यानं जीव सोडला होता. हेही वाचा- मुंबई: आईवर अत्याचार करणाऱ्या बापाला भयंकर शिक्षा; डोक्यात हातोडा घालून केला खेळ खल्लास  या प्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय काला आणि हॅलटचे अधीक्षक डॉ.रिचा गिरी काही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र रात्री कॉलेज प्रशासनाच्या वतीने प्रेस नोट जारी करून प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला. हॉस्पिटलचे म्हणणे आहे की, महिलेला लेबर पेन होत नव्हतं. याआधी डिलिव्हरीच्या वेळी तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Kanpur, Pregnent women, Uttar pradesh news

    पुढील बातम्या