Home /News /sport /

IPL 2021 Final: धोनी सर्वात मोठ्या खेळाडूला संधी देणार का? अशी असेल CSK ची Playing 11

IPL 2021 Final: धोनी सर्वात मोठ्या खेळाडूला संधी देणार का? अशी असेल CSK ची Playing 11

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आयपीएल 2021 फायनलमध्ये (KKR vs CSK IPL 2021 Final) प्लेईंग 11 ची निवड करणे महेंद्रसिंह धोनीसमोर (MS Dhoni) मोठं आव्हान असेल.

    मुंबई, 15 ऑक्टोबर:  कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आयपीएल 2021 फायनलमध्ये (KKR vs CSK IPL 2021 Final) प्लेईंग 11 ची निवड करणे महेंद्रसिंह धोनीसमोर (MS Dhoni) मोठं आव्हान असेल. चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत फायनलमध्ये थेट प्रवेश केला आहे. या मॅचमध्ये रॉबिन उथप्पानं (Robin Uthappa) तिसऱ्या क्रमांकावर येत अर्धशतक झळकावलं होतं. चेन्नईच्या विजयात या खेळीचा मोठा वाटा होता. उथप्पाच्या या खेळीमुळे चेन्नईचा अनुभवी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) याच्या परतीचा मार्ग अवघड बनला आहे. रैना दुखापतीमुळे मागील काही मॅचमध्ये प्लेईंग 11 च्या बाहेर आहे. रैना आयपीएलच्या पहिल्या सिझनपासून सीएसकेचा सदस्य आहे. तो यापूर्वी सीएसकेकडून आठही फायनलमध्ये खेळला आहे. आता सीएसकेची टीम नवव्यांदा फायनलमध्ये गेली असून त्याची टीममधील जागा अडचणीत आली आहे. उथप्पानं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध क्वालिफायर 1 मध्ये 44 बॉलमध्ये 63 रन काढले होते. तर रैनाची बॅट या सिझनमध्ये शांत आहे. त्यानं 12 मॅचमध्ये 18 च्या सरासरीनं 160 रन काढले आहे. या सिझनमध्ये रैनानं केवळ 1 अर्धशतक झळकावलं आहे. अशी असेल सीएसकेची टीम सीएसकेच्या ओपनिंग जोडीत कोणताही बदल होणार नाही. ऋतुराज गायकवाड आणि फाफ ड्यू प्लेसिस ही जोडी फॉर्मात आहे. फायनलमध्येही त्यांच्यावर मोठी भिस्त असेल. मिडल ऑर्डरमध्ये मोईन अली, अंबाती रायूडू आणि रविंद्र जडेजा  आहेत. महेंद्रसिंह धोनीनं दिल्लीविरुद्ध 6 बॉलमध्ये 18 रन काढले होते. त्यामुळे तो फिनिशरची भूमिका पार पाडू शकतो. तसंच गरज पडली तर शार्दुल ठाकूर, ड्वेन ब्राव्हो आणि दीपक चहर हे बॅटींग करु शकतात चेन्नईकडं 10 व्या नंबरपर्यंत बॅटींग करणारे खेळाडू आहेत. आयपीएलमधील हिट जोडी आहे KKR च्या विजेतेपदातील मोठा अडथळा सीएसकेचा मोईन अलीनं  या सिझनमध्ये 6. 4 च्या इकोनॉमी रेटनं रन दिले आहेत. त्याची ही कामगिरी केकेआरच्या वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरीन पेक्षा चांगली आहे. तर दीपक चहर, जोश हेजलवूड आणि ड्वेन ब्राव्हो हे फास्ट बॉलर्सची भूमिका बजावतील. त्यामुळे कुणाला फिटनेसची समस्या आली नाही तर सीएसकेच्या प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल होणार नाही. IPL 2021 Final Live Streaming: KKR vs CSK फायनल कधी आणि कुठे पाहता येणार? संभाव्य Playing 11 : ऋतुराज गायकवाड, फाफ डुप्लेसी, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर आणि जोश हेजलवूड.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni

    पुढील बातम्या