जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Tinder वरील मित्रानं केला विश्वासघात; पुण्यातील IT अभियंता तरुणीला 73 लाखांना फसवलं

Tinder वरील मित्रानं केला विश्वासघात; पुण्यातील IT अभियंता तरुणीला 73 लाखांना फसवलं

Tinder वरील मित्रानं केला विश्वासघात; पुण्यातील IT अभियंता तरुणीला 73 लाखांना फसवलं

Crime in Pune: ‘टिंडर’ या डेटिंग अ‍ॅपवरून (Tinder Dating App) ओळख झालेल्या एका तरुणाने पुण्यातील आयटी अभियंता तरुणीला तब्बल 73 लाख 59 हजार 530 रुपयांना गंडा (Rs 73 lakh Money fraud) घातला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 15 ऑक्टोबर: डेटिंग अ‍ॅपवर झालेली ओळख पुण्यातील एका आयटी अभियंता महिलेला चांगलीच महागात पडली आहे. ‘टिंडर’ या डेटिंग अ‍ॅपवरून (Tinder Dating App) ओळख झालेल्या एका तरुणाने पुण्यातील तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) तब्बल 73 लाख 59 हजार 530 रुपयांना गंडा (Rs 73 lakh Money fraud) घातला आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर, 35 वर्षीय पीडित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह एकूण 18 बँक खाते धारकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तांत्रिक माहितीच्या अधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. सिद्धार्थ रवी असं मुख्य आरोपीचं नाव आहे. टिंडर या डेटिंग अ‍ॅपवर सिद्धार्थ रवी अशी ओळख असणाऱ्या तरुणाची काही दिवसांपूर्वी फिर्यादी तरुणीशी ओळख झाली होती. आरोपीनं फिर्यादीशी ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन केला. तसेच तिला महागडं गिफ्ट पाठवून लग्न करण्याचं आमिष दाखवलं. तसेच आपण भारतात येऊन स्थायिक होणार असल्याचंही त्यानं फिर्यादीला सांगितलं. आरोपीच्या भुलथापांना फिर्यादी महिला बळी पडली अन् आरोपीवर विश्वास ठेवला. हेही वाचा- पुणे: आधी पार्टी केली मग डोक्यात घातली गोळी;अभियंत्याच्या हत्याकांडाला वेगळं वळण यानंतर आरोपीनं आपण तुला भेटण्यासाठी भारतात आलो असल्याचं  सांगितलं. तसेच आपल्याकडे एक कोटी रुयांची मोठी रक्कम असल्याने दिल्ली विमानतळावर कस्टम अधिकाऱ्याने आपल्याला पकडलं असल्याची बतावणी आरोपीनं केली. तसेच एवढी मोठी रक्कम सोडवण्यासाठीचे वेगवेगळे चार्ज, दंड आणि टॅक्स भरायचं असल्याचं तरुणाने फिर्यादीला सांगितलं. यानंतर आरोपीनं वेगवेगळे बँक खाते नंबर पाठवून पीडितेला 73 लाख 59 हजार 530 रुपये पाठवण्यास भाग पाडलं. हेही वाचा- गुगल पे करायला लावलं अन् अडकली जाळ्यात;पुण्यात उच्चशिक्षित तरुणीवर दोघांकडून रेप आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, 35 फिर्यादी तरुणीनं वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी सिद्धार्थ रवीसह अन्य 18 बॅंक खातेदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिलेनं पुरवलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात