Home /News /mumbai /

मुंबई: आईवर अत्याचार करणाऱ्या बापाला भयंकर शिक्षा; डोक्यात हातोडा घालून केला खेळ खल्लास

मुंबई: आईवर अत्याचार करणाऱ्या बापाला भयंकर शिक्षा; डोक्यात हातोडा घालून केला खेळ खल्लास

Murder in Mumbai: मुंबईतील एका तरुणाने आपल्या जन्मदात्या बापाच्या डोक्यात हातोड्याने वार (Stabbed with hammer) करत निर्घृण हत्या (Father brutal murder) केली आहे.

    मुंबई, 15 ऑक्टोबर: मुंबईच्या दहिसर परिसरात हत्येची एक थरारक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या जन्मदात्या बापाच्या डोक्यात हातोड्याने वार (Stabbed with hammer) करत निर्घृण हत्या (Father brutal murder) केली आहे. मृत वडिलांकडून आईवर होणारा अत्याचार न बघवल्याने तरुणाने थेट बापाची हत्या केली आहे. पोटच्या लेकानं भयंकर पद्धतीनं आपल्या वडिलांना संपवल्याची (Son killed father) घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संदीप ऊर्फ बाळा अण्णाराव बनसोडे (वय-25) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुलाचं नाव आहे. तर अण्णाराव बनसोडे असं हत्या झालेल्या 60 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. मृत अण्णाराव बनसोडे हे एक बांधकाम मजूर असून त्यांना दारूचं व्यसन होतं. गेल्या काही वर्षांपासून ते दारुच्या आहारी गेले होती. दररोज दारू पिऊन घरी येत ते बायकोला आणि मुलांना शिवीगाळ आणि मारहाण करायचे. दारुच्या कारणातून बापलेकात नेहमी वाद व्हायचा. तसेच मृत अण्णाराव हे दारुच्या नशेत आपल्या बायकोला छोट्या छोट्या कारणातून शिवीगाळ करत मारहाण करायचे. हेही वाचा-दोन वर्षांच्या बाळानं घेतला आईचा जीव, एका चुकीमुळे वडिलांना झाली अटक आईला होणारी शिवीगाळ आणि मारहाण सहन न झाल्याने आरोपी मुलगा संदीप याने आपल्या वडिलांच्या डोक्यात हातोड्याने वार करत त्यांची हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मृत अण्णाराव हे दारू पिऊन घरी आले होते. नेहमीप्रमाणे यादिवशीही अण्णाराव यांनी आपल्या बायकोशी वाद घालायला सुरुवात केली. तसेच घरातील गॅसचं बटन सुरू ठेवलं. हेही वाचा-मुलांच्या भांडणावरून दोन कुटुंबात राडा, महिलेचा मृत्यू; वडिलांना पडले टाके यावेळी आरोपी मुलगा संदीपने आपल्या वडिलांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण अण्णाराव यांनी त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. वडिलांच्या या कृत्यामुळे संतापलेल्या संदीपने जवळच पडलेल्या एका हातोड्याने बापाच्या डोक्यात जबरी वार केला. हा हल्ला इतका भयंकर होता, की अण्णाराव जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि पुढच्याच क्षणी त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुलाविरोधात दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Mumbai, Murder

    पुढील बातम्या