जाहिरात
मराठी बातम्या / देश / Uttar Pradesh Rape Case : मित्र बनला शत्रु, फिरवून आणण्याच्या बहाण्याने आठ वर्षांच्या मुलीवर केला अत्याचार

Uttar Pradesh Rape Case : मित्र बनला शत्रु, फिरवून आणण्याच्या बहाण्याने आठ वर्षांच्या मुलीवर केला अत्याचार

Uttar Pradesh Rape Case : मित्र बनला शत्रु, फिरवून आणण्याच्या बहाण्याने आठ वर्षांच्या मुलीवर केला अत्याचार

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडात गुन्ह्यांची संख्या सातत्याने वाढत असतानाच माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

  • -MIN READ Trending Desk Uttar Pradesh
  • Last Updated :

ग्रेटर नोएडा 29 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडात गुन्ह्यांची संख्या सातत्याने वाढत असतानाच माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. बिसरख पोलीस ठाण्याअंतर्गत एका 57 वर्षीय नराधमाने आठ वर्षींच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले. घर बदलण्याच्या कामात व्यग्र असल्याने मुलीच्या वडिलांनी विश्वासाने तिला आपल्या मित्राच्या घरी सोडलं होतं. परंतु, विश्वासघात करत त्याने मुलीवर अत्याचार केला. ‘टीव्ही 9 हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे.

जाहिरात

विश्वासावर जगातील सर्व गोष्टी अवलंबून आहेत,अशी म्हण प्रचलित आहे. पण जवळील व्यक्तीकडून विश्वासघात होतो तेव्हा मोठा धक्का बसतो. असंच काहीसं पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांसोबत घडलं आहे. आरोपीनं उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडात इकोव्हिलेज-3 हाऊसिंग सोसायटी परिसरात अत्याचार केल्याचं उघड झालं आहे.

हे ही वाचा :  अनैतिक संबंध अन् पतीचा The End; मृतदेहाचे तुकडे तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये

पीडित मुलीचे वडिल व आरोपी हे दोघे 10 वर्षांपासून चांगले मित्र आहेत. दोघेही इलेक्ट्रिशयनचं काम करतात. दोन्ही कुटुंबांचं आपुलकीचं नातं आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलीच्या आई-वडिलांना दुसऱ्या हाऊसिंग सोसायटीत घर बदलायचे होते. या घाईत मुलीकडे लक्ष देणं होणार नाही म्हणून वडिलांनी मुलीला मित्राच्या घरी सोडलं. पण याचा गैरफायदा घेत आरोपीने त्या मुलीवर अत्याचार केला.

जाहिरात

भेदरलेल्या मुलीने आईला सांगितलं सत्य

वडिलांनी मित्राच्या घरी चिमुकलीला सोडल्यानंतर आरोपी तिला एका शांत जागी घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार केला. त्याच दिवशी रात्री आई-वडिल पीडित मुलीला नेण्यासाठी आरोपीच्या घरी गेले. तिला घेऊन ते नवीन घरी परतले. चिमुकलीने घडलेला प्रसंग वडिलांना सांगितला नाही. परंतु, ती भेदरलेली दिसल्यानं आईने तिला विश्वासात घेऊन विचारपुस केली तेव्हा तिने घडलेला घटनाक्रम सांगितला. मुलीची स्थिती पाहता आई-वडिल तिला घेऊन डॉक्टरांकडे उपचारांसाठी घेऊन गेले. तेव्हा मुलीसोबत अत्याचार झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

जाहिरात

पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

घडलेला घटनाक्रम व भेदरलेली स्थिती पाहता पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला. पीडित चिमुकलीच्या आई-वडिलांनी तक्रार दिल्यानंतर पॉक्सो कायद्याअंतर्गत व इतर कलमान्वेय गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता नराधमाने घडलेला प्रसंग सांगितला.

हे ही वाचा : श्रद्धा हत्या प्रकरणात आफताबला वडिलांची साथ? पोलिसांनी सांगितली Inside story

जाहिरात

फिरवण्याचा बहाणा करून दुष्कृत्य

बिसरख पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या प्रकरणात आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सर्व प्रकार सांगितला. चिमुकलीला तिच्या आई-वडिलांनी आपल्याकडे सोडल्यानंतर तिला फिरवण्याच्या बहाण्यानं सोसायटीच्या क्लबमध्ये नेलं व तिथचं मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा त्या आरोपीनं कबूल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात