मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

श्रद्धा हत्या प्रकरणात आफताबला वडिलांची साथ? पोलिसांनी सांगितली Inside story

श्रद्धा हत्या प्रकरणात आफताबला वडिलांची साथ? पोलिसांनी सांगितली Inside story

श्रद्धा वालकर हत्या प्रकणात आता नवे वळण येण्याची शक्यता आहे. एखाद्या चित्रपटाप्रमाणे या हत्याकांडात नवी वळणे येत असल्याने पुढे काय होणार याची सगळ्यानाच उत्कंटा लागली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 26 नोव्हेंबर : श्रद्धा वालकर हत्या प्रकणात आता नवे वळण येण्याची शक्यता आहे. एखाद्या चित्रपटाप्रमाणे या हत्याकांडात नवी वळणे येत असल्याने पुढे काय होणार याची सगळ्यानाच उत्सुकता लागली आहे. या घटनेतील आरोपी आफताब पूनावाला याचे वडील अमीन पूनावाला आता दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहेत.

वास्तविक, या हत्येप्रकरणी मृत श्रद्धाने 2020 साली पोलिसांना दिलेले तक्रार पत्र समोर आले आहे. हे पत्रानंतर दिल्ली पोलिसांना संशय अमीन पूनावाला यांच्यावर संशया आला आहे. आफताब आणि अमिन हे दोघे एकमेकांच्या सतत संपर्कात होते, मग त्यांनी यावेळी आफताबला श्रद्धाबद्दल का विचारले नाही. असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हे ही वाचा : आणखी एक 'श्रद्धा'! विवाहित मुस्लीम तरुणाने युवतीला फसवलं, बोलणं बंद करताच भयानक कांड

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जून रोजी आफताब वसईहून दिल्लीला आपले सामान हलवत असताना, तो आपल्या वडिलांना आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेला होता का, असा संशय घेण्यात आला आहे. दरम्यान आफताबला वडिलांनी सामान हलवायला मदत केली का? या गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत.

श्रद्धाचे तक्रार पत्र समोर आल्यानंतर, आफताबचे वडील आणि इतर कुटुंबीयांना आफताबच्या गुन्ह्याची माहिती नव्हती का असा सवाल उपस्थित केला जात आहे. की वडील आफताबच्या वाईट सवयींना पाठीशी घालत होते याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत.

हे ही वाचा : घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला पण निर्णय चुकला; प्रेमानेच घेतला 19 वर्षीय तरुणीचा जीव

दिल्ली पोलिस आफताब नशेखोर होता का? याचाही तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबला ड्रग्जचे व्यसन होते आणि त्यासाठी तो वसई, मीरा रोड आणि भाईंदरच्या ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात होता.

First published:

Tags: Mumbai, Mumbai police, Murder Mystery, Murder news