मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अनैतिक संबंध अन् पतीचा The End; मृतदेहाचे तुकडे तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये

अनैतिक संबंध अन् पतीचा The End; मृतदेहाचे तुकडे तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये

आरोपी मुलगा दीपकने सांगितले की, त्याच्या आईने अनेक लग्न केली आहेत. त्यांनी अंजन दास यांच्याशी शेवटचे लग्न केले.

आरोपी मुलगा दीपकने सांगितले की, त्याच्या आईने अनेक लग्न केली आहेत. त्यांनी अंजन दास यांच्याशी शेवटचे लग्न केले.

आरोपी मुलगा दीपकने सांगितले की, त्याच्या आईने अनेक लग्न केली आहेत. त्यांनी अंजन दास यांच्याशी शेवटचे लग्न केले.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : अलीकडच्या काळात अनैतिक संबंध, प्रेमप्रकरणांमुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा वालकर हत्याकांड जोरदार चर्चेत आहे. आतापर्यंत पोलीस तपासात या निर्दयी हत्याकांडाच्या अनुषंगाने अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. श्रद्धा वालकर हत्या प्रकरण चर्चेत असताना दिल्लीत अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. एका मध्यमवयीन व्यक्तीचे त्याच्या सावत्र मुलाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. ही बाब समजताच या व्यक्तीच्या सावत्र मुलानं आणि त्याच्या आईच्या मदतीने वडिलांची हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाचे बारीक तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले आणि अनेक दिवसांपर्यंत आरोपी या मृतदेहाचे तुकड्यांची विविध ठिकाणी विल्हेवाट लावत होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करताच अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र पोलिसांनी काही गोष्टींबाबत माहिती दिलेली नाही.

दिल्लीतील पांडवनगर हत्याकांडात पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे. पांडवनगर येथे राहणाऱ्या एका मध्यमवयीन व्यक्तीचे त्याच्या सावत्र मुलाच्या पत्नीशी म्हणजे सुनेशी अनैतिक संबंध होते. या संबंधाविषयी समजताच त्याच्या सावत्र मुलगा आणि मृत व्यक्तीच्या दुसऱ्या पत्नीने त्याची हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये लपवून ठेवले. त्यानंतर काही दिवस या तुकड्यांची विविध ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली, असा दावा पोलिसांनी केला आहे. आरोपींची चौकशी केली असता, अनेक संवेदनशील गोष्टी समोर आल्या आहेत, असं पोलिसांनी सांगितलं.

वाचा - श्रद्धा हत्या प्रकरणात आफताबला वडिलांची साथ? पोलिसांनी सांगितली Inside story

या हत्याकांडातील आरोपी दीपकने पोलीस चौकशीत सांगितलं, ``माझ्या आईने अनेक विवाह केले होते. अंजन दास नावाच्या व्यक्तीसोबत तिचा शेवटचा विवाह झाला होता. अंजन दासपूर्वी माझ्या आईचा विवाह कल्लू नावाच्या व्यक्तीशी झाला होता. ते माझे वडील आहेत. अंजन यांचे देखील चार ते पाच विवाह झाले होते. याशिवाय त्यांचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध होते. घरात माझ्या पत्नीवर माझ्या सावत्र वडिलांचा डोळा होता. मला याबाबत माहिती समजताच मी माझ्या आईला या प्रकाराची माहिती दिली आणि सावत्र वडिलांना नशेच्या गोळ्या दिल्या. ते नशेत असताना मी वडिलांची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह घराबाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावता आली नाही. त्यामुळे आईच्या मदतीनं मी मृतदेहाचे बारीक तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.``

``ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी आम्ही मृतदेहाचे बारीक तुकडे केले आणि त्यादिवशी एक तुकडा फेकून दिला. दुसऱ्यादिवशी रात्र होईपर्यंत तुकड्यांचा वास येऊ लागला. त्यामुळे एक तुकडा बाहेर ठेवून आम्ही बाकीचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले. अंधार पडल्यानंतर बाहेर ठेवलेला तुकडा बाहेर जाऊन फेकून दिला,`` असं आरोपीनं पोलीस चौकशीदरम्यान सांगितलं. दरम्यान, आरोपी मुलानं वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते. हे तुकडे फेकण्याची ठिकाणं विचारपूर्वक निवडली होती. गरुड आणि कावळे यांना सहज खाद्य मिळेल अशा ठिकाणी हे तुकडे टाकण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला होता. याशिवाय काही तुकडे त्याने नाल्यातही फेकले.

पोलीस चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले, ``मी माझ्या वडिलांची हत्या केली आहे. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करण्याची हिंमत होत नव्हती. हात थरथरत होते. त्यावेळी मी नशेच्या गोळ्या घेतल्या आणि नशेतच मृतदेहाचे तुकडे केले.`` ``30 मे रोजी पहिल्यांदा अंजन दास यांच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. तसेच काही सीसीटीव्ही फुटेजही मिळाले. या फुटेजच्या आधारे प्रकरणाचा तपास करताना आम्ही आरोपी आई व मुलास अटक केली. आता अंजन दासच्या डीएनए प्रोफायलिंगचा निर्णय घेण्यात आला आहे,`` असं पोलिसांनी सांगितलं.

First published:

Tags: Crime, Delhi