Home /News /national /

UP Election Result 2022: भाजप सोडणाऱ्या दोन मंत्र्यांना मतदारांनी शिकवला धडा, पक्षांतर पडलं चांगलंच महागात

UP Election Result 2022: भाजप सोडणाऱ्या दोन मंत्र्यांना मतदारांनी शिकवला धडा, पक्षांतर पडलं चांगलंच महागात

UP Election Result 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly elections) भाजपचा (BJP) विजय झाला आहे. मात्र यात दोन नेत्यांना निवडणुकीपूर्वी भाजप पक्षाला रामराम करणं चांगलंच महागात पडलं आहे.

    उत्तर प्रदेश, 11 मार्च: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly elections) भाजपचा (BJP) विजय झाला आहे. मात्र यात दोन नेत्यांना निवडणुकीपूर्वी भाजप पक्षाला रामराम करणं चांगलंच महागात पडलं आहे. राजकारणाचे हवामानशास्त्रज्ञ म्हणवलं जाणारे स्वामी प्रसाद मौर्य यांचं यावेळी उत्तर प्रदेशच्या राजकारणाचं हवामान चुकलं. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच मंत्रीपद सोडून सपामध्ये दाखल झालेले मौर्य आपली जागाही वाचवू शकले नाहीत. यावेळी त्यांनी पडरौना जागेऐवजी फाजीलनगरमधून निवडणूक लढवली. पक्ष आणि जागा बदलणाऱ्या मौर्य यांना फाजीलनगरच्या जनतेनं नाकारले आहे. स्वामी प्रसाद मौर्य भाजप सोडताना म्हणाले होते की, यूपीमधून स्वामी सारख्या मुंगुसाचा नायनाट करूनच साप सदृश आरएसएस आणि सापासारखी भाजप मारली जाईल. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना ते म्हणाले, मला जनादेशाचा आदर करावा लागेल. मी निवडणूक हरलो, हिंमत नाही. UP Election Result: कोण आहे पल्लवी पटेल? ज्यांनी योगी-मोदींना दिली जबरदस्त टक्कर भाजप सोडून सपामध्ये दाखल झालेल्या तीन मंत्र्यांपैकी दोन मंत्री निवडणुकीत पराभूत झाले आहेत. केवळ एका मंत्र्याला आपली जागा वाचवण्यात यश आलं. आयुष मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सपामध्ये दाखल झालेले धरमसिंह सैनी हे सहारनपूरमधील नकुडमधून निवडणूक हरले आहेत. पक्षांतर करणाऱ्या धरमसिंह सैनी यांना जनतेने नाकारलं आहे. वनमंत्रीपद सोडून सपामध्ये दाखल झालेले दारा सिंह चौहान यांनी मऊच्या घोसी मतदारसंघातूनक काटे की टक्कर देऊन निवडणूक जिंकली आहे. यावेळी त्यांनी जागा बदलून मधुबनऐवजी घोसी येथून निवडणूक लढवली. सपा सोडून भाजपमध्ये दाखल झालेले मुलायम सिंह यादव यांचे जवळचे मित्र हरिओम यादव हेही सिरसागंजमधून निवडणूक पराभूत झाले आहेत. काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले आमदार नरेश सैनी सहारनपूरच्या बेहट मतदारसंघातून निवडणूक हरले आहेत. पक्ष बदलणं त्यांच्या पचणी पडलं नाही. येथे सपा-आरएलडी युतीचे उमेदवार उमर अली खान विजयी झाले आहेत. काँग्रेसमधून सपामध्ये आलेल्या सुप्रिया आरोन यांचाही बरेली कँटमधून पराभव झाला आहे. भाजप सोडून आरएलडीमध्ये दाखल झालेले अवतार सिंह भडाना यांचा जेवरमधून पराभव झाला. काँग्रेसमधून सोनेलालकडे गेलेले हैदर अली खान ऊर्फ हमजा मियाँ यांचा रामपूरच्या स्वारमधून पराभव झाला. त्यांचा काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले अमेठीचे संजय सिंह माजी मंत्री गायत्री प्रजापती यांच्या पत्नी महराजजी प्रजापती यांच्याकडून पराभूत झाले. UP Election Result 2022: BJP च्या वादळात एकाच BSP नेत्यानं राखला गड, कोण आहे जनतेचा हा 'रॉबिनहूड' आंबेडकर नगरच्या अकबरपूर मतदारसंघातून राम अचल राजभर विजयी झाले आहेत. काटेहरीमधून लालजी वर्मा, जलालपूरमधून राकेश पांडे आणि आलापूरमधून त्रिभुवन दत्त वर्मा यांनीही निवडणूक जिंकली आहे. चौघेही बसपा सोडून सपामध्ये गेले होते. काँग्रेसमधून सपामध्ये आलेले पंकज मलिक चारथावळमधून निवडणूक जिंकले आहेत. उन्नावच्या पूर्वमधून बसपाचे आमदार अनिल सिंह विजयी झाले आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या अदिती सिंह पुन्हा एकदा रायबरेलीच्या आमदार झाल्या आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Assembly Election, BJP, UP Election, Uttar pradesh news

    पुढील बातम्या