मराठी बातम्या /बातम्या /देश /

UP Election Result 2022: कोण आहे पल्लवी पटेल? ज्या योगी-मोदी यांच्यावर पडल्या भारी

UP Election Result 2022: कोण आहे पल्लवी पटेल? ज्या योगी-मोदी यांच्यावर पडल्या भारी

UP Election Result 2022:  सिरथू मतदारसंघातून केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांचा पराभव झाला आहे. या जागेवरून समाजवादी पार्टीच्या (Samajwadi Party) पल्लवी पटेल विजयी झाल्या आहेत.

UP Election Result 2022: सिरथू मतदारसंघातून केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांचा पराभव झाला आहे. या जागेवरून समाजवादी पार्टीच्या (Samajwadi Party) पल्लवी पटेल विजयी झाल्या आहेत.

UP Election Result 2022: सिरथू मतदारसंघातून केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांचा पराभव झाला आहे. या जागेवरून समाजवादी पार्टीच्या (Samajwadi Party) पल्लवी पटेल विजयी झाल्या आहेत.

  उत्तर प्रदेश, 11 मार्च: सिरथू मतदारसंघातून केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांचा पराभव झाला आहे. या जागेवरून समाजवादी पार्टीच्या (Samajwadi Party) पल्लवी पटेल विजयी झाल्या आहेत. पल्लवी पटेल (Pallavi Patel) यांना एकूण 106278 मते मिळाली. त्याचवेळी केशव प्रसाद मौर्य यांना 98941 मते मिळाली. पहिल्या फेरीत केशव मौर्य यांनी 870 मतांनी आघाडी घेतली. त्यानंतर मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत केशव मौर्य यांना 2953 आणि सपाच्या पल्लवी यांना 4278 मते मिळाली. पल्लवी यांनी या फेरीतून केशव यांना मागं सोडलं. त्याचप्रमाणे दुसऱ्या ते शेवटच्या फेरीपर्यंत पल्लवी यांनी आपली आघाडी कायम ठेवली आणि 33व्या फेरीत मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा पल्लवी यांनी त्यात बाजी मारली आणि केशव यांचा 7337 मतांनी पराभव झाला. शेवटच्या क्षणी सिरथूमध्ये पल्लवी यांची एन्ट्री किंबहुना सिरथूमध्ये केशव प्रसाद मौर्य यांना घेरण्यासाठी सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी निवडणूक सुरू होण्याच्या दोन आठवडे आधी पल्लवी पटेल यांना उमेदवारी दिली. सुरुवातीच्या द्विधा मन:स्थितीनंतर पल्लवी पटेल मैदानात उतरल्या होत्या. पण त्यांचा विजयाचा मार्ग पाहण्यासारखा सोपा नव्हता. शेवटच्या क्षणी मैदानात उतरणं हे त्याचं सर्वात मोठं कारण होतं. पल्लवी पटेल यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला. स्वतःला कौशांबीची सून म्हणवून वातावरण निर्माण केलं. महिलांमध्येही त्याचा शिरकाव झाला. यासोबतच भटक्या जनावरांसारखा मुद्दाही उपस्थित केला. सपा प्रमुख अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यादव ते राज्यसभा सदस्य जया बच्चन यांनी पल्लवी पटेल यांच्या बाजूने प्रचार केला. Punjab Election Result 2022: आपचा मोठा निर्णय, या गावात भगवंत मान घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ भाजपसोबत युती करणाऱ्या अनुप्रिया पटेल या पल्लवी पटेलची सख्खी बहीण आहे. त्यांचे वडील सोनेलाल हे यूपीचे मोठे नेते होते आणि ते मायावतींच्या जवळचे मानले जात होते. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला होता. 2009 मध्ये सोनेलाल यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी कृष्णा पटेल यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. 2014 मध्ये मिर्झापूरमधून लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर अनुप्रिया पटेल यांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर अनुप्रिया पटेल आणि त्यांचे पती आशिष सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर डिसेंबर 2016 मध्ये अनुप्रिया पटेल यांनी आपला दल (सोनेलाल) हा नवा पक्ष स्थापन केला. दुसरा गट कृष्णा पटेल यांचा आहे, ज्याचे प्रमुख कृष्णा पटेल आणि त्यांची मुलगी पल्लवी पटेल आहेत. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य पराभूत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य पराभूत झाले आहे. समाजवादी पार्टीच्या उमेदवाराने केश मौर्य (keshav prasad maurya) यांचा पराभव केला आहे. केशव मौर्य हे कौशांबीच्या सिराथू मतदारसंघातून उभे होते. रात्री उशिरा मतमोजणी पूर्ण झाली आहे. या ठिकाणाहून समाजवादी पक्षाच्या उमेदवार पल्लवी पटेल विजयी झाल्या आहेत. केशव प्रसाद मौर्य यांचा तब्बल 6832 मतांनी पराभव केला आहे. पल्लवी पटेल यांनी 6832 मतांनी विजय मिळवला आहे. पल्लवी पटेल यांना एकूण 105559 मतं मिळाली. तर केशव प्रसाद मौर्य यांना 98727 मत मिळाली.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Assembly Election, Narendra modi, Uttar pradesh news, Yogi Aadityanath

  पुढील बातम्या