Home /News /national /

UP Election Result 2022: BJP च्या वादळात एकाच BSP नेत्यानं राखला गड, कोण आहे जनतेचा हा 'रॉबिनहूड'

UP Election Result 2022: BJP च्या वादळात एकाच BSP नेत्यानं राखला गड, कोण आहे जनतेचा हा 'रॉबिनहूड'

UP Assembly Election 2022: नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) मोठा विजय संपादन केला आहे. पण या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाची (BSP) कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे.

    बलिया, 11 मार्च: नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) मोठा विजय संपादन केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांचं सरकार स्थापन होणार आहे. पण या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाची (BSP) कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात बसपाला केवळ एकच जागा जिंकता आली. रॉबिनहूड म्हणून नावलौकिक असणाऱ्या उमाशंकर सिंह यांनी बसपाकडून एकमेव जागा जिंकत लाज राखली आहे. ते सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. बहुजन समाज पक्षाचे आमदार उमाशंकर सिंह यांनी बलिया जिल्ह्यातील रसडा विधानसभा मतदारसंघातून 87,887 मते मिळवून विजय संपादन केला आहे. त्यांनी भारतीय समाज पक्षाचे (SBSP) उमेदवार सुहेलदेव महेंद्र यांच्यावर 6,583 मतांच्या फरकानं मात केली आहे. सुहेलदेव महेंद्र यांना 81,304 मतं मिळाली आहेत. रसडा विधानसभा मतदारसंघाचे बसपाचे विद्यमान आमदार उमाशंकर सिंह यांनी तिसऱ्यांदा आपली जागा कायम राखली आहे. हेही वाचा-उत्पल पर्रीकरांना परत भाजपात घेणार का? देवेंद्र फडणवीस म्हणतात.... याआधी उमाशंकर सिंह रसडा विधानसभा मतदार संघातून  2012 आणि 2017 साली निवडणूक जिंकली होती. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत यूपीमध्ये भाजपला प्रचंड जनसमर्थन मिळालं आहे. अशातही उमाशंकर सिंह आपली जागा जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत. हेही वाचा-UP Election Result: कोण आहे पल्लवी पटेल? ज्यांनी योगी-मोदींना दिली जबरदस्त टक्कर खरंतर, रसडा विधानसभा मतदार संघात उमाशंकर सिंह यांना 'रॉबिनहूड' म्हणून ओळखलं जातं. उमाशंकर हे गरिबांच्या मदतीला लगेच धावून येतात. एखाद्या गरीब कुटुबांत मुलीचं लग्न असेल तर त्यांनाही उमाशंकर मदत करत असतात. उमाशंकर सिंह हे व्यवसायानं ठेकेदार आहेत. 2012 साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली होती, त्यात ते विजयी झाले. यानंतर 2017 मध्येही त्यांनी आपली आमदारकी कायम राखली. त्यानंतर आता 2022 मध्येही सलग तिसऱ्यांदा उमाशंकर सिंह विजयी झाले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: UP Election

    पुढील बातम्या