नवी दिल्ली, 29 एप्रिल: देशात अनेक राज्यांमध्ये कोरोनाची (Coronavirus) परिस्थिती सध्या एवढी गंभीर बनली की, कितीही मोठा व्यक्ती असला तरी त्याला बेड किंवा इतर सुविधा मिळणं कठीण झाले आहे. उत्तर प्रदेशच्या (Coronavirus in UP) एका आमदारांचं (BJP MLA died in UP after corona infection) नुकतंच कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांचं मृत्यूपूर्वीचं एक पत्र आता व्हायरल होत आहे. या आमदारांनाही 24 तास आयसीयू बेडसाठी (Bed shortage in UP) झगडावं लागल्याचीही माहिती समोर आली आहे.
(वाचा-वाह रे पठ्ठ्या! COVID सेंटरमध्ये असूनही अभ्यास नाही थांबला,IAS अधिकारी म्हणाले..)
उत्तर प्रदेशच्या बरेली येथील नवाबगंजचे आमदार केसर सिंह यांना 18 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर केसर सिंह हे त्यांच्या मतदार संघात असलेल्या श्रीराममूर्ती स्मारक रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. पण त्यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना उपचारादरम्यान अधिक तपासण्या आणि प्लाझ्मा थेरपीचा सल्ला स्थानिक डॉक्टरांनी दिला होती. त्यासाठी केसरसिंह यांना दिल्लीला उपचारासाठी जायचं होतं.
केसर सिंह यांनी याबाबत 18 एप्रिल रोजीच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये केसर सिंह यांनी दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात एका बेडची मागणी केली होती. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आयसीयू बेड मिळवण्यासाठी त्यांना जवळपास 24 तास वाट पाहावी लागली होती. दरम्यान केसर सिंह यांची प्रकृती ढासळत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना सोशल मीडियावर नाराजीही व्यक्त केली होती. यानंतर उत्तर प्रदेशच्या आरोग्य मंत्रालयानं हालचाली केल्या आणि त्यांना नोयडातील एका रुग्णालयात हलवण्यात आलं होतं.
(वाचा-Oxygen Crisis: टाटांनी पुन्हा वाढवला ऑक्सिजनच पुरवठा,600 टन ऐवजी पुरवणार 800 टन)
नोयडात उपचार सुरू झाल्यानंतर केसरसिंह यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचंही सांगण्यात आलं होतं. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती. पण बुधवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचं निधन झाल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. उत्तर प्रदेशात कोरोनामुळं निधन झालेले केसर सिंह हे तिसरे भाजप आमदार आहेत. त्यांच्या निधनानंतर आता त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र समोर आलं आहं. या पत्रावरून सोशल मीडियावर उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवरही नेटकऱ्यांचा संताप व्यक्त होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
BJP MLA of Nawabganj, Bareilly, Kesar Singh who died on Tuesday of COVID-19 had earlier written a letter to union health min @drharshvardhan seeking help for getting him admission in Max Hospital, Delhi as doctors advised him proper treatment and plasma therapy. Viral letter pic.twitter.com/7EWgGMZkzi
— Rajeev Mullick (@rmulko) April 28, 2021
उत्तर प्रदेशात सध्या कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. राज्यात रोजच्या कोरोना रुग्णांच्या आकड्याने 35 हजारांची पातळी ओलांडली आहे. तर आतापर्यंतचा कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडाही 12 हजारांच्या पुढं गेला आहे. त्यामुळे अगदी कुणालाही बेड किंवा चांगल्या सुविधा मिळणे कठीण झालेलं दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Corona, Coronavirus, Covid-19, India, Mla, Uttar pradesh news