मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Oxygen Crisis: टाटांनी पुन्हा वाढवला ऑक्सिजनच पुरवठा, आता 600 टन ऐवजी पुरवणार 800 टन

Oxygen Crisis: टाटांनी पुन्हा वाढवला ऑक्सिजनच पुरवठा, आता 600 टन ऐवजी पुरवणार 800 टन

Representative Image

Representative Image

Oxygen Crisis: रुग्णालयातील ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता आता टाटा स्टीलने (Tata Steel) कोव्हिड रुग्णांच्या उपचारांसाठी दररोज केला जाणारा पुरवठा वाढवला आहे

नवी दिल्ली, 29 एप्रिल: कोरोना दुसऱ्या लाटेमध्ये (Second Wave of Coronavirus) अनेक रुग्णालयांध्ये मेडिकल ऑक्सिजनचा तुटवडा (Shortage of Medical Oxygen) पाहायला मिळतो आहे. रुग्णालयातील ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता आता टाटा स्टीलने (Tata Steel) कोव्हिड रुग्णांच्या उपचारांसाठी दररोज केला जाणारा पुरवठा वाढवला आहे. टाटा स्टीलने आता पुरवठ्याची क्षमता 600 टनवरून 800 टन केली आहे.

टाटा स्टीलने बुधवारी अशी माहिती दिली आहे की, त्यांनी कोव्हिड-19 रुग्णांच्या उपचारासाठी मेडिकल ऑक्‍सिजन (Medical Oxygen) चा पुरवठा आणखी वाढवून दररोज 800 टन केला आहे. सोमवारी कंपनीने अशी माहिती दिली होती की, रुग्णालयांसाठी ऑक्सिजन पुरवठा वाढवून 600 टन केला आहे. टाटा स्टीलने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

(हे वाचा- Corona रुग्ण दगावल्याने नातेवाईकांची तोडफोड, दुसऱ्यांदा या हॉस्पिटलवर हल्ला)

टाटा स्टीलने ट्वीट करत अशी माहिती दिली आहे टाटा स्टीलकडून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोव्हिड विरोधात संघर्ष जारी राहील. आम्ही भारत सरकार आणि राज्य सरकारांसह मिळून काम करत आहोत. जेणेकरून मागणी पूर्ण केली जाईल आणि अमुल्य जीव वाचवला जाईल.

टँकर्सचे मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये केलं जात आहे रुपांतरण

स्टील कंपन्यांनी राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी नायट्रोजन आणि एर्गोन टँकर्सचे रुपांतरण लिक्विड ऑक्सिजन टँकर्समध्ये केले आहे. जेणेकरून वेगाने ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल. कंपन्यांनी जवळपास 8345 मेट्रिक टन क्षमतेचे 765 नायट्रोजन आणि 7642 मेट्रिक टन क्षमतेचे 434 एर्गोन टँकर लिक्विड ऑक्सिजन टँकर्समध्ये रुपांतरीत केले आहेत.

First published:

Tags: Coronavirus, Covid-19, Oxygen supply, Tata group