Home /News /national /

वाह रे पठ्ठ्या! COVID सेंटरमध्ये असूनही अभ्यास नाही थांबला, IAS अधिकाऱ्यांनी केलं जिद्दीचं कौतुक

वाह रे पठ्ठ्या! COVID सेंटरमध्ये असूनही अभ्यास नाही थांबला, IAS अधिकाऱ्यांनी केलं जिद्दीचं कौतुक

सध्या सोशल मीडियावर एका विद्यार्थ्याचा फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे कोरोना संक्रमित असूनही हा तरुण रुग्णालयात परीक्षेची तयारी करताना दिसून येत आहे.

    नवी दिल्ली, 29 एप्रिल: कोरोना संकटाने सध्या थैमान घातले असून देशात रोज तीन ते साडेतीन लाख कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहे. मृतांचा आकडा चिंता वाढवत असून या विषाणूमुळं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यत सगळ्यांनाच आपलं शिकार बनवायला सुरुवात केली आहे. दरम्यान, या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे फारसं लक्ष देता येत नाहीये. सध्या सोशल मीडियावर अशाच ओडिसाच्या (Odisha) विद्यार्थ्याचा फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे कोरोना संक्रमित असूनही हा तरुण रुग्णालयात परीक्षेची तयारी करताना दिसून येत आहे. चार्टर्ड एकाउंटंट्सच्या परीक्षेची तयारी (Covid Patient Preparing For CA Exam) सुरू असल्याची माहिती या तरूणानं दिली आहे. या तरुणाच्या बेडवर कॅलक्युलेटर, पुस्तकं सारं काही ठेवलं असून तीन लोक पीपीई किट घालून त्याच्या समोर उभे आहेत. गंजम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजय कुलंगे यांनी बेरहमपूरच्या एमकेसीजी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात भेट दिली तेव्हा हा फोटो काढण्यात आला. कुलंगे यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर केला आणि रुग्णाचे कौतुक केले. आयएएस अधिकारी यांनी लिहिले की, 'यश हा योगायोग नाही. आपण सपर्मण करणं आवश्यक आहे.' ते म्हणाले, "मी कोविड हॉस्पिटलला गेलो आणि ही व्यक्ती परीक्षेचा अभ्यास करत होती. आपले समर्पण आपल्याला आपल्या वेदना विसरायला लावते. त्यानंतर यश केवळ औपचारिकता आहे." हा फोटो चांगलाच व्हायरल होत असून आतापर्यंत या फोटोला ३१ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. हे वाचा - Corona रुग्ण दगावल्याने नाशिकमध्ये नातेवाईकांची तोडफोड, 15 दिवसांत दुसऱ्यांदा या हॉस्पिटलवर हल्ला ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी रविवारी 18 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील सर्व लोकांना कोविड लसीकरण मोफत जाहीर केले. सध्या ओडिसा सहा राज्यांना ऑक्सिजन पुरवित आहे. दरम्यान, देशातील जवळपास सर्वच राज्यांंमध्ये बाधित रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. या भयानक स्थितीत लोकांना रुग्णालयात खाटा मिळणे मुश्कील झाले असून आणि रुग्णांचा उपचाराविना मृत्यू (Corona Death) होत आहे. बुधवारी देशात पुन्हा तब्बल 3 लाख 80 हजार रुग्णांची नोंद झाली तर 3,646 लोकांचा मृत्यू झाला. दिलासादायक ठरणारी एकमेव बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Corona Recovery Rate) वाढले असून गेल्या 24 तासात 2 लाख 70 हजार रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona updates, Corona virus in india, Coronavirus, Covid-19, Odisha

    पुढील बातम्या