उत्तर प्रदेश, 21 जानेवारी: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) विधानसभा (Assembly Elections) निवडणुकीपूर्वी काँग्रेसने (Congress) शुक्रवारी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात 20 लाख तरुणांना रोजगार देण्यासोबतच अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. काँग्रेसने यूथ मॅनिफेस्टो जारी करताना प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना यूपीमधील काँग्रेसच्या सीएम उमेदवाराबद्दल (Congress CM candidate) विचारले असता त्या म्हणाल्या की, तुम्हाला दुसरा कोणता चेहरा दिसत आहे का?
प्रियंका गांधी यांनी दिले संकेत
प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबद्दल उघडपणे काहीही सांगितले नाही. मात्र त्यांनी स्वतःला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सांगितला. जाहीरनामा प्रसिद्ध करताना पत्रकारांनी त्यांना विचारले की, यूपी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा चेहरा कोण आहे? या प्रश्नाच्या उत्तर देताना प्रियंका यांनी उलट प्रश्न केला की, तुम्हाला यूपीमध्ये दुसरा कोणता चेहरा दिसतो. तुम्हीच सांगा तुम्हाला यूपीमध्ये कोणता चेहरा दिसत आहे.
काँग्रेसकडून यूपीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी शुक्रवारी दिल्लीत उत्तर प्रदेशसाठी युवा जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसने 20 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. 8 लाख नोकऱ्या फक्त महिलांना दिल्या जातील, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
प्रियंका गांधी लढवणार विधानसभा निवडणूक?
यावेळी प्रियंका गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे कोणतेही संकेत दिले नाहीत. मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला नाही आणि निवडणूक लढवण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही आहे, असं त्या म्हणाल्यात. पुढे त्यांनी सांगितलं की, ठरलं की तुम्हाला ते समजेलच.
उत्तर प्रदेशमध्ये 7 टप्प्यात विधानसभा निवडणूक
यावेळी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यात निवडणुका होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होऊन विधानसभा निवडणुकीची सुरुवात होणार आहे.
बहिणीची बदनामी नाही झाली सहन; मेहुण्याने भाऊजीला दिली भयंकर शिक्षा, सोलापुरातील घटना
त्यानंतर 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात 55 जागा, 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यात 59 जागा, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागा, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यात 60 जागा, 3 मार्चला सहाव्या टप्प्यात 57 जागा आणि 7 मार्चला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 54 जागांवर मतदान होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election, Rahul Gandhi (Politician), Uttar pradesh news, काँग्रेस