Home /News /maharashtra /

बहिणीची बदनामी नाही झाली सहन; मेहुण्याने भाऊजीला दिली भयंकर शिक्षा, सोलापुरातील घटना

बहिणीची बदनामी नाही झाली सहन; मेहुण्याने भाऊजीला दिली भयंकर शिक्षा, सोलापुरातील घटना

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Crime in Solapur: सोलापूर जिल्ह्याच्या मोहळ तालुक्यातील तांबोळे याठिकाणी एका तरुणाने आपल्या भाऊजींच्या डोक्यात लोखंडी हातोडा (brother in law attack on sisters husband with hammer) घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    मोहोळ, 21 जानेवारी: सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील तांबोळे याठिकाणी एका तरुणाने आपल्या भाऊजींच्या डोक्यात लोखंडी हातोडा घातल्याची (brother in law attack on sisters husband with hammer) धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीची बदनामी सहन न झाल्याच्या कारणातून संबंधित तरुणाने हे धक्कादायक कृत्य केलं आहे. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. मनोज बापू चौधरी असं फिर्यादी भाऊजीचं नाव असून ते मोहोळ तालुक्यातील तांबोळे येथील रहिवासी आहेत. तर हनुमंत सदाशिव चव्हाण असं हतोड्याने वार करणाऱ्या मेहुण्याचं नाव आहे. याच्यासोबतच विठ्ठल सदाशिव चव्हाण व सासू मैनाबाई चव्हाण, सासरे सदाशिव चव्हाण या तिघांवर देखील गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. डोक्यात हातोडा घातल्याची घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. हेही वाचा-झोपेतच केला घात; पत्नीने अपंग पतीला दिला भयंकर मृत्यू,कोल्हापुरला हादरवणारी घटना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज चौधरी यांचं काही वर्षांपूर्वी औंढी येथील शिवानी चव्हाण नावाच्या मुलीसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवस आनंदात गेल्यानंतर, तीन वर्षांपूर्वी शिवानीचा आपल्या सासरच्या मंडळींशी वाद विवाद झाला होता. यामुळे शिवानी आपल्या माहेरी गेली होती. त्यामुळे दोघांनी एकमेकांविरोधात कोर्टात खटले दाखल केले होते. पण त्यानंतर दीड वर्षांपूर्वी दोघांतील हे भांडण आपसात मिटवून घेण्यात आलं. त्यानंतर शिवानी पुन्हा तांबोळे येथे नांदायला गेली. पण घरात पुन्हा भांडणं होत राहिली. हेही वाचा-'तुझी कायमची सोय लावते' म्हणत पतीवर केले वार, कारण वाचून लावाल डोक्याला हात यानंतर घटनेच्या दिवशी 20 जानेवारी रोजी सकाळी 11 च्या सुमारास फिर्यादी मनोज चौधरीचे मेहुणे हनुमंत सदाशिव चव्हाण, विठ्ठल सदाशिव चव्हाण व सासू मैनाबाई चव्हाण, सासरे सदाशिव चव्हाण असे चौघे त्यांच्या घरी आले होते. मनोज यांचा भाऊ सुनील याने आमच्या मुलीची समाजात बदनामी केली आहे. तो कुठे आहे? असा जाब आरोपींनी मनोज यांना विचारला. तेवढ्यात फिर्यादीचा भाऊ सुनील त्याठिकाणी दुचाकीवर आला. यावेळी मेहुणे हनुमंत आणि विठ्ठल याने सुनीला काठीने मारहाण करायला सुरुवात केली. या प्रकारानंतर मनोज भांडण सोडवण्यासाठी पुढे सरसावले. यावेळी संतापलेल्या भावाने जवळचं पडलेला हातोडा आपले भाऊजी मनोज यांच्या डोक्यात घातला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Solapur

    पुढील बातम्या