मराठी बातम्या /बातम्या /देश /

राहुल गांधी यांनी दलित महिलेशी लग्न करावं, रामदास आठवलेंचा सल्ला

राहुल गांधी यांनी दलित महिलेशी लग्न करावं, रामदास आठवलेंचा सल्ला

रामदास आठवले आपल्या मजेशीर बोलण्यानं कायम चर्चेत असतात. आताही त्यांनी राहुल गांधींबाबत असंच एक विधान केलं आहे.

रामदास आठवले आपल्या मजेशीर बोलण्यानं कायम चर्चेत असतात. आताही त्यांनी राहुल गांधींबाबत असंच एक विधान केलं आहे.

रामदास आठवले आपल्या मजेशीर बोलण्यानं कायम चर्चेत असतात. आताही त्यांनी राहुल गांधींबाबत असंच एक विधान केलं आहे.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारला (Central government) कृषी कायद्यांबाबत (New farm laws) नुकतीच 'हम दो हमारे दो' अशी कोपरखळी मारली. आता यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union minister Ramdas Aathavale) यांनीही राहुल गांधी यांना अशाच मिश्किल शब्दात उत्तर दिलं आहे. रामदास आठवले यांनी मंगळवारी राहुल गांधी यांना सल्ला दिला, की राहुल यांनी आता विवाहबद्ध व्हावं (Rahul Gandhi should get married). त्यातल्या त्यात एखाद्या दलित महिलेशी (Dalit Woman) त्यांनी विवाह केला तर अधिक चांगलं. ते म्हणाले, 'मला हा विश्वास आहे, की राहुल हे माझे चांगले मित्र आहेत. आणि सध्या ते 'हम दो हमारे दो'विषयी बोलत आहेत. हे घोषवाक्य वापरलं गेलं होतं, ते कुटुंब नियोजनाबाबत (family planning). आता राहुल गांधी यांना 'हम दो हमारे दो' पाहिजे असतील तर त्यांनी लग्न केलं पाहिजे. त्यांनी त्यातही दलित महिलेशी लग्न केलं, तर महात्मा गांधींनी (Mahatma Gandhi) पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लागेल. यातून जातीनिर्मूलनही होऊ शकेल. यातून सर्व तरुणांनाही एक दिशा मिळेल.' एएनआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. (हे वाचा मोठी बातमी, उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा बंगल्यावर भेट) 'त्यामुळं राहुल यांनी आता लग्न करावं. त्यातल्या त्यात दलित महिलेलाच त्यांनी जोडीदार म्हणून निवडावं. हा माझा राहुल यांना सल्ला आहे.' रामदास आठवले सध्या केंद्रात सामाजिक न्याय मंत्री आहेत. या भूमिकेतून त्यांनी अशीही पुस्ती जोडली, की केंद्र सरकार आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला अडीच लाख रुपयांची मदत करतं. राहुल गांधी यांना आम्ही या योजनेचाही लाभ मिळवून देऊ. राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात लोकसभेत भाषण (Loksabha Speech) करताना सरकारवर हल्ला चढवला. 'हम दो हमारे दो' असं उपरोधानं बोलत ते म्हणाले, 'केंद्र सरकारनं आणलेले नवीन कृषी कायद्यांमुळे बाजार समिती व्यवस्था (Mandi system) कोसळून पडेल आणि अनिर्बंध साठेबाजीलाही (unlimited hoarding) प्रोत्साहन मिळेल.' असं ते बोलले. (हे वाचा-निकिता जेकबची अटक लांबणीवर; टूलकिट प्रकरणात हायकोर्टाकडून दिलासा) रामदास आठवले हे आपल्या गंमतीदार वक्तव्यांसह चारोळ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. रामदास आठवलेंचा मागच्या फेब्रुवारीतला व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. यात त्यांनी कोरोनाबाबत बोलताना 'गो कोरोना गो' (Go corona Go) अशी घोषणा दिली होती. आता नवा कोरोना व्हायरस आल्यावरही त्यांनी 'नो कोरोना नो' अशी नवी घोषणा दिली.
First published:

Tags: Congress, Dalit, India, Loksabha, Marriage, Rahul Gandhi (Politician), Ramdas aathavale, Sonia gandhi

पुढील बातम्या