जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / निकिता जेकबची अटक लांबणीवर; टूलकिट प्रकरणात हायकोर्टाकडून दिलासा

निकिता जेकबची अटक लांबणीवर; टूलकिट प्रकरणात हायकोर्टाकडून दिलासा

निकिता जेकबची अटक लांबणीवर; टूलकिट प्रकरणात हायकोर्टाकडून दिलासा

‘टूलकिट’ प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या प्रकरणात आरोपी वकील निकिता जेकब (Nikita Jacob)हिची अटक आता लांबणीवर गेली आहे. याप्रकरणी निकिताला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 फेब्रुवारी: दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यात मुंबई हायकोर्टाने बुधवारी आरोपी वकील निकिता जेकबला (Nikita Jacob) तीन आठवड्यांसाठी अटकेपासून दिलासा दिला. न्यायालयाने निकिताला तीन आठवड्यांचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे निदान 3 आठवड्यांसाठी तरी दिल्ली पोलीस निकिताला अटक करू शकणार नाहीत. निकितावर शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिट बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचा आरोप आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने न्यायमूर्ती पी.डी. नाईक यांनी हा निर्णय दिला, ज्यामध्ये टूलकिट प्रकरणात अडकलेल्या शंतनू मुलुक याला ट्रान्झिट जामीन मंजुर झाला होता. टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी निकिताविरोधात अजामिनपात्र वारंट जारी केलं होतं. न्यायालयात वकील म्हणाले की निकिता जेकबचा हिंसा भडकवण्याचा कोणताही धार्मिक, राजकीय आणि आर्थिक हेतू नव्हता. निकिताच्या वतीने वकील मिहिर देसाई यांनी औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आदेश न्यायमूर्ती नाईक यांच्यासमोर सादर केला. सुनावणीदरम्यान कोर्टाकडून असे सांगण्यात आले की, या गुन्ह्याचा तपास दिल्ली पोलिस करत आहेत आणि दिल्लीत एफआयआर नोंदविला गेला आहे. शिवाय जेकबच्या घरावर टाकलेल्या छाप्यात तिचा फोन आणि मोबाइल जप्त करण्यात आला आहे. निकिताच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, निकिता दिल्ली पोलिसांना सहकार्य करण्यास तयार आहे. तिने केवळ अजामिनपात्र वारंट विरोधात अपील केलं आहे, जेणेकरून तिला दिल्ली कोर्टात जाण्यापूर्वी पुरावे गोळा करता येतील. (हे वाचा- Sandeep Nahar Suicide Case: संदीप नाहरच्या पत्नी आणि सासू विरोधात गुन्हा दाखल ) दिल्ली पोलिसांची बाजू मांडणारे वकील हितेन वेंगोकर यांनी कोर्टात असे म्हटले की, कोर्टाने न्यायाधीश एएस गडकरी यांनी दिलेल्या निर्णयावर विचार करावा. 11 फेब्रुवारी रोजी जेकबच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. याठिकाणी झडती घेण्यात आली होती आणि जप्तीही करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी शेतकरी आंदोलनासंबंधातील टूलकिट प्रकरणात बेंगळुरूतील अॅक्टिव्हिस्ट दिशा रवी हिला अटक केली होती. ज्यानंतर पोलिसांनी जेकब आणि शंतनूचा शोध सुरू केला. असा देखील आरोप केला जात आहे की, निकिता आणि शंतनू खलिस्तान्यांच्या संपर्कात आहेत, ज्यांनी हे टूलकिट बनवण्यात मदत केली होती. हे टूलकिट दिशाने ग्रेटा थनबर्गला पाठवल्याचा आरोप केला जात आहे. याच प्रकरणी दिशा रविला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात