जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मोठी बातमी, उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा बंगल्यावर भेट

मोठी बातमी, उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा बंगल्यावर भेट

मोठी बातमी, उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा बंगल्यावर भेट

उदयनराजे भोसले हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गेले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 फेब्रुवारी : मराठा आरक्षणाच्या  मुद्यावर भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) हे अधिक आक्रमक झाले आहे. नवी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray)यांची भेट घेतली आहे. साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले मुंबईच्या दौऱ्यावर आहे. आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गेले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षण संदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता  वर्तवण्यात येत आहे. 11 फेब्रुवारी रोजी  नवी दिल्लीतील शरद पवार यांच्या निवास्थानी जाऊन उदयनराजे यांनी भेट घेतली होती. यावेळी, मराठा आरक्षण संदर्भात सरकार गंभीर नाही. वकिलांनी सुप्रीम कोर्टात योग्य बाजू मांडली नाही. त्यामुळे मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने  श्वेत पत्रिका सादर करावी, अशी मागणी उदयनराजेंनी केली. तसंच, वडिलकीच्या नात्यानं पवारांनी यात लक्ष घालावे अन्यथा राज्यात मोठा उद्रेक होईल.राज्य सरकारने लवकर तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या वेळी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली होती. त्यानंतर आज पहिल्यांदाच उदयनराजे हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात