मराठी बातम्या /बातम्या /देश /विश्लेषण: 1987 मधील निवडणुकीत पहिल्यांदा दिसले मोदींचे 'गुजरात मॉडेल'- अमित शहा

विश्लेषण: 1987 मधील निवडणुकीत पहिल्यांदा दिसले मोदींचे 'गुजरात मॉडेल'- अमित शहा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1987 साली झालेल्या निवडणुकीत गुजरात मॉडेल तयार केले. मोदींचे हे मॉडेल इतरांपेक्षा कसं वेगळं आहे, याबाबतचा सवितस्त लेख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लिहिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1987 साली झालेल्या निवडणुकीत गुजरात मॉडेल तयार केले. मोदींचे हे मॉडेल इतरांपेक्षा कसं वेगळं आहे, याबाबतचा सवितस्त लेख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लिहिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1987 साली झालेल्या निवडणुकीत गुजरात मॉडेल तयार केले. मोदींचे हे मॉडेल इतरांपेक्षा कसं वेगळं आहे, याबाबतचा सवितस्त लेख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लिहिला आहे.

अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

2014 साली झालेली लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2014) ही भारतीय ही भारतीय राजकारणाच्या (Indian Politics) इतिहासातील सर्वांत निर्णायक बदल घडवणारी निवडणूक होती हे आता सर्वांनाच समजलं आहे. या निवडणुकीत नरेंद्रभाई आणि पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं. भारतीय जनता पक्ष (BJP) हा स्वबळावर बहुमत मिळवणारा 30 वर्षांतील पहिला पक्ष ठरला होता. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (National Democratic Alliance) दोन तृतीयांश बहुमत मिळालं. 1984 पासून लोकसभेत कोणत्याही पक्षाला अशाप्रकारे पूर्ण बहुमत (Majority) मिळालं नव्हतं.

1951-52 आणि 1984 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये, ज्या पक्षांनी आणि पंतप्रधानांनी बहुमत मिळवलं होतं त्यांनी स्वातंत्र्य चळवळीदरम्यान निर्माण झालेली सहानुभूती, कौटुंबिक वारसा, विद्यमान सरकारविरूद्धचा राग (1977), भीती व सहानुभूतीचं मिश्रण (1984), आंतरराष्ट्रीय मुत्सद्दीपणा (तुष्टीकरण), एखाद्या वर्गाबाबत पूर्वग्रह, ‘गरिबी हटाओ’सारख्या पोकळ घोषणा (1971) आणि व्होट बँकेचं राजकारण (Mobilisation) या गोष्टींच्या आधारावर स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी चांगल्या भवितव्याची आशा दाखववून कोणत्याही पक्षाला लोकसभेत पूर्ण बहुमत मिळवलं नव्हतं. तसंच जनतेसाठी केलेल्या चांगल्या कामाच्या बळावरही असं बहुमत कुणी मिळवलं नव्हतं.

राजकीय तडजोडीची 25 वर्ष

1989 ते 2014 पर्यंत 25 वर्षं भारतावर विविध पक्षांच्या युतींचं (Coalitions) राज्य होतं. ही युती म्हणजे राजकीय हितसंबंधांची आणि धोरणात्मक परिणामांची तडजोड होती. नागरिकदेखील स्वत:च्या, कुटुंबाच्या आणि आपल्या स्वप्नांतील भारतासंबंधित असलेल्या सर्व आशा-आकाक्षांशी तडजोड करू लागले होते. धोरण लकवा, प्रशासकीय गोंधळ, मंत्र्यांची भांडणं व मित्रपक्षांना ब्लॅकमेल करणं, भ्रष्टाचार, असुरक्षितता, दहशतवादामुळे निर्माण झालेली असुरक्षितता, कमकुवत आणि गोंधळलेले पंतप्रधान (Prime Ministers) अशा वेगवेगळ्या नकारात्मक गोष्टी या आघाडी सरकारमध्ये होत्या. आघाडी काळातील पंतप्रधान लीडरपेक्षा एक मॅनेजर म्हणूनच काम करत होते. हा भारतीय लोकशाहीला (Indian Democracy) लागलेला एक प्रकारचा शाप होता.

देशात आणि जनतेच्या मनात एक प्रकारचा अपेक्षांचा समतोल ढासळला  होता. महत्त्वाकांक्षी विचार न करण्याचं वळण आपण स्वत:ला लावून घेतलं होतं. 2004 ते 2014 या 10 वर्षांत तर या राष्ट्रीय निराशेनं कळसच (कदाचित 'नादिर' हा अधिक योग्य शब्द ठरू शकतो) गाठला होता. जनतेचं मनोबल कमी होतं. भारतातील लोक निराश झाले होते. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधानपदासाठी एक आश्वासक अखिल भारतीय उमेदवार म्हणून उदयास आले. त्यांनी भाजपला नवीन क्षेत्रं, मतदारसंघ आणि सामाजिक गटात नेलं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांनी लोकांच्या मनात आशेची ज्योत प्रज्ज्वलित केली.

पंतप्रधान मोदींवर लिहिलेलं पुस्तक ‘Modi @20: Dreams Meet Delivery’ प्रकाशित, जाणून घ्या, काय आहे पुस्तकात

मोदी लोकप्रिय कसे झाले?

एवढ्या कमी कालावधीत मोदी देशभरात इतके लोकप्रिय आणि प्रसिद्ध कसे झाले? केवळ एका ब्लॉकबस्टर निवडणूक प्रचाराचा तो परिणाम होता का? की भाजपच्या कार्यकर्त्यांनीच नव्हे, तर लाखो बिगरराजकीय स्वयंसेवकांनी प्रत्येक गल्ली आणि प्रत्येक गल्लीला दिलेल्या मेसेजमुळे? की मोदींवर विश्वास ठेवणाऱ्या आदर्शवादी स्त्री-पुरुष आणि तरुण-तरुणींमुळे? किंवा मल्टिपल टेक्नॉलॉजी फोर्सच्या (Multiple Technology Forces) मदतीनं हे सर्व घडलं का? ही सर्व तर माध्यमं होती. पण, मोदीनी जनतेला दिलेला संदेश जास्त प्रभावी आणि परिणामकारक ठरला होता. गुजरातमध्ये केलेल्या कामाच्या माध्यमातून चिकाटी, प्रयत्न आणि आर्थिक व सामाजिक यशाचा हा संदेश त्यांनी फार पूर्वीच जनतेला दिला होता.

मी 1987 साली अहमदाबादमध्ये नरेंद्रभाईंना पहिल्यांदा भेटलो. तेव्हा नुकतीच त्यांची भाजप गुजरात स्टेट युनिटचे सेक्रेटरी (Organisation) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अहमदाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या होत्या. या निवडणुकीचा जाणीवपूर्वक उल्लेख करावाच लागेल. तेव्हा गुजरात आणि देशभरात काँग्रेसचं वर्चस्व होतं. 1984 आणि 1985 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं होतं. भाजप त्यावेळी एक राजकीय आणि निवडणूक शक्ती म्हणून एकदम तळाला होता. भाजपला मोठा टप्पा पार करायचा होता. अहमदाबाद महानगरपालिकेत केवळ डझनभर जागा मिळाल्यामुळे आमचा पक्ष फारसा हिशोबात धरलाही जात नव्हता.

चीनला दणका, नेपाळ आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारताकडे सोपवणार!

काय होती मोदींची पद्धत?

निवडणुकीची जबाबदारी दिल्यानंतर नरेंद्रभाईंनी आम्हाला मोठं लक्ष ठेवण्यास आणि पद्धतशीरपणे नियोजन करण्यास शिकवलं. त्यांनी आम्हाला निवडणुका आणि निवडणूक प्रचाराचा पुनर्विचार आणि पुनर्कल्पना करण्यास शिकवलं. अहमदाबादमध्ये प्रदेश भाजपाचा सरचिटणीस म्हणून मी त्यांना जवळून पाहिलं. त्यांच्या कार्यपद्धतीचं निरीक्षण केलं आणि नंतर त्यांनी सांगितलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. मोदींच्या रणनीतीचा मूळ आधार अतिशय सोपा होता. पक्ष (Party) आणि संघ नेटवर्कची (Team Network) शक्ती आणि क्षमता एकत्रित व अनुकूल करण्यावर त्यांचा भर होता. त्यांच्या रणनीतीचा निकाल नक्कीच थक्क करणारा होता. महानगरपालिकेच्या निवडणुकीतील बहुतांश जागा आणि महापौरपद भाजपानं मिळवलं.

या विजयानंतर आम्ही मागं वळून पाहिलं नाही. 1988 मध्ये, स्टेट वाईड मेंबरशीप ड्राईव्ह (Membership Drive) म्हणजे गुजरातमध्ये भाजप सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आलं. सदस्यत्व नोंदीच्या पारंपरिक कार्यक्रमाचं मोदींनी ‘संघटन पर्व’ (Sangathan Parva) या मोठ्या उत्सवामध्ये रूपांतर केलं. ही भाजपची राज्यस्तरीय सदस्य नोंदणी मोहीम ही जनसहभागातून एखादा उत्सव साजरा केला जावा तशी राबवली गेली पाहिजे ही त्यांच्या मनातील स्पष्ट कल्पना होती. पक्षाच्या नेत्यांचा एखादा कार्यक्रम होतो तशी ही मोहीम किंवा अभियान नसावं. जनतेनं त्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा असं नरेंद्रभाईंना वाटत होतं. नोंदणी झालेल्या सभासदांना नंबर देण्याच्या आणि त्यांची नोंदवही तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तालुका आणि जिल्हा स्तरावर या नोंदवह्या ठेवल्या जातील. त्यांची कधीही तपासणी होईल, असं नियोजन त्यांनी केलं होतं.

इतर कार्यकर्त्यांप्रमाणं मलाही काही जिल्ह्यांची जबाबदारी दिली होती. सभासद नोंदणी कार्यक्रमाचे रेकॉर्ड तपासण्यासाठी मला त्या ठिकाणांना भेटी द्याव्या लागल्या होत्या. मी नरेंद्रभाईंसोबत गुजरात राज्याचे दोन सविस्तर दौरे केले. त्यांचा कामाचा वेग, निरीक्षणशक्ती आणि प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक पाहण्याची सवय थक्क करणारी होती. मला जितक्या गोष्टी आत्मसात करणं शक्य झालं तितक्या मी केल्या. त्यांनी वेळोवेळी दिलेले सल्ले कायम माझ्यासाठी उपयुक्त ठरले.

नरेंद्रभाईंनी आम्हाला सांगितलं होतं की, प्रत्येक गावात आधीच्या सरपंचाच्या निवडणुकीतील दोन प्रमुख उमेदवार असण्याची शक्यता होती. त्यामुळे विजयी उमेदवार हे काँग्रेस (Congress) किंवा जनता दल (Janata Dal) या गुजरातमधील दोन आघाडीच्या पक्षांचे असतील. जे या निवडणुकीत पराभूत होतील त्यांना बाजूला सारलं जाईल. पार्टीच्या मेंबरशीप ड्राईव्हचा एक भाग म्हणून मोदींनी आम्हाला उपविजेत्यांवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना नरेंद्रभाईंनी आम्हाला दिली.

31 वर्षे जुने प्रकरण, 353 वर्षांचा इतिहास.. ज्ञानवापी मशीदीवर हक्क कोणाचा?

त्यांनी वर्तवलेल्या अंदाजात एक प्रकारची धार होती. सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्यांना 30 ते 40 टक्के मतं मिळतील, असं ते म्हणाले होते. जिंकण्यासाठी एवढी मतं नक्कीच पुरेशी नव्हती. तरीही मोदींनी आम्हाला अशा सर्व व्यक्तींशी संपर्क साधण्यास सांगितलं आणि त्यांना सन्मानानं भाजपमध्ये आमंत्रित केलं. आमच्या पक्षाची भूमिका आणि तत्त्वज्ञान याबद्दल त्यांच्याशी प्रामाणिकपणे चर्चा केली. यामुळे आमच्या पक्षाला मोठ्या संख्येनं मतदार मिळत गेले. या कार्यपद्धतीमुळे आम्हाला काही प्रभावशाली नेते मिळाले. अशा प्रकारे मोदींनी गुजरातमध्ये पक्ष संघटनेची बांधणी केली. त्यांनी पक्षाचा विस्तार आणि त्याची निवडणुकीतील स्पर्धात्मकता वाढवण्याची जबाबदारी एकत्रितपणे पार पडली हे स्पष्ट होतं. शासन हा या जबाबदारीचा थर्ड अँगल असणार होता आणि 2001 मध्ये मोदींना भाजपचं वैचारिक वेगळेपण कायम ठेवण्याचा हा त्रिकोण पूर्ण करण्याची संधी देण्यात आली.

गुजरातचा कायापालट

आपल्या 13 वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत नरेंद्र मोदींनी गुजरातचा कायापालट केला. सुरुवातीच्या टप्प्यातील औद्योगिक आणि कमॉडिटी इकॉनॉमीपासून (Commodity Economy) सुरू झालेला हा विकास मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस पॉवरहाऊस स्टेटच्या ओळखीपर्यंत आला. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्येही संधी शोधल्या. त्यांच्या काळात प्रत्येक घरापर्यंत नळाचं पाणी पोहोचलं आणि 'टेक्नॉलॉजी असिस्टेड सॉईल हेल्थ कार्डा'मुळं राज्यातील लहान शेतकरी अधिक सक्षम झाले. त्यांनी आदिवासी भागात दुग्ध व्यवसाय क्रांती घडवून आणली. कधीकाळी भूंकपाच्या ढिगाऱ्यात गाडल्या गेलेल्या कच्छला (Kutch) आधुनिक औद्योगिक अर्थव्यवस्थेचं प्रतीक बनवलं. एकूणच राज्यातील जीवन आणि उपजीविकेचं स्वरूप बदललं होतं.

भूकंपाचा प्रतिकार करू शकतील अशा घरांच्या निर्मितीपासून ते एकविसाव्या शतकातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीपर्यंचा टप्पा मोदींनी गाठला होता. त्यांनी सुरू केलेल्या विकास कामांचा वेग कुणालाही थांबवता आला नाही. हा तर मी नरेंद्रभाईंच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीचा फक्त धावता आढावा दिला आहे. या पुस्तकातील इतर प्रकरणांमध्ये अशा अनेक गोष्टींचं वर्णन दिलेलं आहे. वैयक्तिक हित आणि आकडेवारीच्या पलीकडे जाऊन मोदींनी गुजरातमध्ये जो बदल घडवून आणला तो पब्लिक सर्व्हिस आणि शासन व्यवस्थेचा एक नवीन नमुना होता.

भारतीय निवडणूक प्रक्रियेमध्ये एखाद्या सरकारविरोधी अँटी-इन्कम्बन्सी(Anti-incumbency) जनमत असताना त्या सरकारविरोधात मतदान करून ते उलथवून टाकण्याची जनतेची पद्धत नरेंद्र मोदींना माहीत होती;पण अशा प्रकारच्या जनभावनेला घाबरून न जाता त्यांनी आपली पद्धत राबवली. मतदारांचा सेन्स आणि संवेदनशीलतेवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. त्यांनी मतदरांना काय चूक आणि काय बरोबर याची जाणीव करून दिली. त्यातून त्यांनी एक दीर्घकालीन चांगला हेतू साध्य करून दाखवला. त्यांनी दीर्घकालीन भविष्याचा विचार करून गुजरातमधील अनेक उपक्रम राबवले. नर्मदेचं पाणी दक्षिण गुजरातमधून सौराष्ट्रात आणणं, हा असाच एक उपक्रम होता. त्यांच्या कार्यपद्धतीला पूर्णपणे यश मिळण्यास एकापेक्षा जास्त इलेक्शन सायकलचा काळ लागला. पण, मोदींनी केवळ पुढची निवडणूकच नाही तर पुढील दशकातील गुजरात आणि पिढ्यांचा विचार करून काम केलं. आमच्या अपेक्षेप्रमाणं पुढील कित्येक दशकांसाठी भाजप गुजरातच्या विकासासाठी राजकीय माध्यम बनलं.

आश्वासनं नाही तर रिपोर्ट कार्ड दिलं

मोदींच्या तर्कशुद्धतेला आणि त्यांच्या दृष्टिकोनाला सातत्यपूर्ण थेट संवादाची गरज होती. गांधीनगर येथील भाजप सचिवालयानं त्यांच्यावर कधीही बंधनं घातली नाही. त्यांनी कित्येक आठवडे राज्यभर प्रवास केला. समाजाच्या विविध स्तरांतील श्रोते आणि स्टेकहोल्डर्सपर्यंत त्यांनी सरकारी योजनांचे लाभ पोहचवले. केवळ मीडियाशी बोलण्यापेक्षा थेट लोकांशी बोला, अशी शिकवण त्यांनी भाजपमध्ये मुरवण्याचं काम केलं.

त्यांनी सरकारी प्रकल्पांविरुद्ध केलेल्या निदर्शनांच्या परिणामांचा हुशारीने उपयोग करून घेतला. त्यांनी त्या प्रकल्पामुळे ज्या भागातील जनतेला आणि त्या भागाला फायदा झाला त्याची उदाहरणं जनतेसमोर मांडली आणि जनतेला पटवून दिलं की, हा प्रकल्प जर तार्किकदृष्ट्या योग्य पद्धतीने राबवला गेला तर उर्वरित जनतेलाही त्याचा लाभ होऊ शकतो. निवडणुकीच्या वेळी त्यांनी फक्त नवीन आश्वासनंच दिली नाहीत तर अगोदरच्या कामाचं एक रिपोर्ट कार्ड त्यांनी जनतेला सादर केलं. पाच वर्षांपूर्वी त्यांनी दिलेल्या आश्वासनांची सध्या काय स्थिती आहे, याचं एक स्पष्ट चित्र त्यांनी लोकांना दाखवलं.

नरेंद्र मोदी हे आपल्याच पक्षाचा जाहीरनामा (Manifesto) विसरतील असे राजकारणी नक्कीच नाहीत. पक्षाशी त्यांचं एक अतिशय भावनिक नातं आहे. ही गोष्ट हृदयस्पर्शी आणि दुर्मिळ आहे. त्यांच्या बोलण्यातून कितीतरी वेळा ही गोष्ट जाणवते. उदाहरणचं द्यायचं झालं तर, मे 2014 मध्ये संसदेत भाषण करताना ते म्हणाले होते, ते पक्षाला 'आई' मानतात. भाजप ही त्यांची आई आहे जिनं त्यांचं पालनपोषण केलं आणि त्यांना ओळख मिळवून दिली. पक्षाचा जाहीरनामा हा त्यांच्यासाठी आईची आज्ञा आहे. जाहीरनाम्याचं त्यांच्यालेखी पवित्र स्थान असून त्याचा सन्मान करणं ही त्यांची जबाबदार आहे.

मोदींनी आपल्या भावना प्रत्यक्षात साध्य करून दाखवल्या. त्यामुळे गुजराती जनतेला नवीन राजकीय आणि सार्वजनिक सेवा संस्कृती अनुभवायला मिळाली. यापूर्वी गुजरातमधील कोणताही मुख्यमंत्री जातीय सलोख्याच्या बाजूनं बोलला नव्हता. मोदी मात्र, गुजरातमधील प्रत्येक गुजराती व्यक्तीच्या बाजून बोलले. त्यांनी प्रत्येकाचा विचार केला. इच्छा, डिझाईन आणि अंमलबजावणी या तीन घटकांना अनुसरून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असलेल्या मोदींच्या विकास योजना इतक्या व्यवस्थित होत्या की प्रत्येक कुटुंबाला त्या भावल्या. गुजरात राज्यातील मतदानाचा इतिहास, जातीचं राजकीय समीकरण या सगळ्या घटकांना अपवाद करून गुजरातच्या जनतेला मोदी सरकारच्या योजना आपल्यासाठीच राबवल्या जात असल्याचा पक्का विश्वास वाटला.

ही राजकीय संस्कृती म्हणजे नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये निर्माण केलेला महान वारसा आहे. त्यामुळे 1990 च्या दशकाच्या मध्यापासून राज्यातील जनतेनं भाजपकडे कधीही पाठ फिरवली नाही, यात नवल वाटण्याचं कारण नाही. भाजपची गुजराती समाज, त्यांच्या आशा आणि त्यांच्या स्वप्नांसोबत तयार झालेली ओळख निरपेक्ष आहे. 2014 नंतर संपूर्ण देशात हेच गुजरात मॉडेल (Gujarat Model) अस्तित्त्वात आलं आहे. 2014 ची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली, तसतसं गुजरात मॉडेल आणि युती-काँग्रेस मॉडेल या दोन मॉडेलमधील फरक जनतेच्या नजरेत स्पष्ट झाला. गुजरातमधील विकासाच्या गतीसोबत दिल्लीतील फसव्या यूपीए सरकारला (UPA Government) जुळवून घेता आलं नाही. मोदींनी भारताला जागं करण्याचं काम केलं.

(ब्लूक्राफ्ट डिजिटल फाऊंडेशननं संपादित आणि संकलित केलेल्या Modi@20: Dreams Meet Delivery या पुस्तकामधील हा पॅरेग्राफ रुपा पब्लिकेशनच्या परवानगीने प्रकाशित करण्यात आला आहे.)

First published:

Tags: Amit Shah, Gujarat, PM narendra modi