Home /News /national /

चीनला दणका, नेपाळ आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारताकडे सोपवणार!

चीनला दणका, नेपाळ आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारताकडे सोपवणार!

या प्रकल्पात तयार झालेली वीज भारतात विकण्याचं नेपाळचं नियोजन आहे. नेपाळ भारतात वीज विक्री करण्याची योजना आखत असेल तर

या प्रकल्पात तयार झालेली वीज भारतात विकण्याचं नेपाळचं नियोजन आहे. नेपाळ भारतात वीज विक्री करण्याची योजना आखत असेल तर

या प्रकल्पात तयार झालेली वीज भारतात विकण्याचं नेपाळचं नियोजन आहे. नेपाळ भारतात वीज विक्री करण्याची योजना आखत असेल तर

    नवी दिल्ली, 11 मे : निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेला नेपाळ हा देश भारताचा शेजारी आहे. शेजारी राष्ट्रांना विकासासाठी साह्य करण्याची भारताची भूमिका पूर्वीपासून कायम आहे. भारताचं नेपाळविषयीचं धोरणही त्याला अपवाद नाही. पश्चिम सेती जलऊर्जा प्रकल्प (Western Seti Hydropower Project) हा नेपाळ सरकारचा (Nepal Government) महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. गेल्या काही वर्षांपासून हा प्रकल्प केवळ चर्चेत अडकला आहे; मात्र आता या प्रकल्पाच्या अनुषंगानं महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नेपाळ सरकारने पश्चिम सेती हायड्रो पॉवर प्रकल्पाच्या विकासासाठी भारताशी (India) चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाबाबत यापूर्वी नेपाळची चीनशी (China) चर्चा सुरू होती; पण आता या प्रकल्पाच्या विकासासाठी भारताला साकडं घालण्याचा निर्णय नेपाळ सरकारनं घेतला आहे. नेपाळमधल्या दुर्गम पश्चिम भागात सेती नदीवर उभारल्या जाणाऱ्या प्रस्तावित 1250 मेगावॅटच्या पश्चिम सेती हायड्रो पॉवर प्रकल्पाबाबत गेल्या सहा दशकांपासून चर्चा सुरू आहे. त्यातच आता या प्रकल्पाच्या विकासासाठी भारताशी चर्चा करण्याचा निर्णय नेपाळने घेतला आहे. नेपाळी माध्यमांच्या वृत्तानुसार, 2012 आणि 2017 मध्ये या प्रकल्पाच्या अनुषंगाने चिनी कंपन्यांशी करार करण्यात आला होता. 'सेती हायड्रो पॉवर प्रकल्पाच्या विकासासाठी आता भारताशी चर्चा करण्यात येत आहे,' अशी माहिती नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा (Prime Minister Sher Bahadur Deuba) यांनी दिली आहे. या प्रकल्पातून 1250 मेगावॅट वीज निर्मिती शक्य आहे, याबद्दल वृत्त `लाइव्ह हिंदुस्तान डॉट कॉम`ने दिलं आहे. या प्रकल्पात तयार झालेली वीज भारतात विकण्याचं नेपाळचं नियोजन आहे. नेपाळ भारतात वीज विक्री करण्याची योजना आखत असेल तर संबंधित प्रकल्पात कोणत्याही प्रकारे चीनचा सहभाग नसावा, असं भारताने नेपाळला स्पष्टपणे सांगितलं आहे. या कारणामुळेच नेपाळने पश्चिम सेती हायड्रो पॉवर प्रकल्पाच्या विकासासाठी भारताशी संपर्क साधला आहे, असं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. (महापालिका निवडणुका तात्काळ लागल्यास अडचणींचा डोंगर, मंत्रिमंडळ बैठकीत खलबतं) माध्यमांतल्या वृत्तांनुसार, पश्चिम सेती हायड्रो पॉवर प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्यासाठी 1981 पासून नियोजन सुरू आहे. 1981 मध्ये सोग्रेह या फ्रान्समधल्या कंपनीनं 37 मेगावॉटच्या प्रकल्पाचा अभ्यास केला होता; मात्र त्या आराखड्यात धरण बांधण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यानंतर 1987 मध्ये या फ्रेंच कंपनीनं (French Company) आपली योजना बदलली आणि पर्यावरणाला हानी न पोहोचवता 380 मेगावॉट विजेचा साठा करता येईल, असं सांगितलं. 1994 मध्ये एका ऑस्ट्रेलियन कंपनीला (Australian Company) या प्रकल्पाचं सर्वेक्षण करण्याचा परवाना मिळाला. या प्रकल्पांतर्गत 90 टक्के वीज भारताला विक्री करण्याचा विचार होता. या सर्व घडामोडी होऊनही या प्रकल्पाचं काम सुरू होऊ शकलं नाही. त्यानंतर चायना नॅशनल मशिनरी अ‍ॅंड इक्विपमेंट इम्पोर्ट अ‍ॅंड एक्सपोर्ट कॉर्पोरेशन या चिनी कंपनीनं या प्रकल्पात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. 2009 मध्ये नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान माधव नेपाळ चीनच्या दौऱ्यावर गेले आणि त्यांनी करारावर स्वाक्षरी केली. चिनी कंपनीनं त्यात 15 अब्ज नेपाळी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला; पण नंतर त्या कंपनीने गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण नसल्याचं कारण देऊन प्रकल्प सोडण्याची भाषा केली. त्यामुळे नेपाळ सरकारने कंपनीचा परवाना रद्द केला. 2017 मध्ये थ्री गॉर्जेस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन या चिनी कंपनीने प्रकल्पात स्वारस्य दाखवलं; मात्र 2018 मध्ये या कंपनीने मोठ्या प्रमाणात पुनर्वसन खर्चाचं कारण देऊन प्रकल्प सोडण्याची भाषा केली. त्यामुळे तेही रद्द झालं. ('तेरे संग प्यार मैं...' नागिणीच्या मृत्यूनंतर कोब्रा बसून होता मृतदेहाजवळ) याबाबत नेपाळचे पंतप्रधान देउबा यांनी सांगितलं, 'भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 16 मे रोजी लुंबिनी दौऱ्यावर येत आहेत. त्या वेळी पश्चिम सेती हायड्रो पॉवर प्रकल्पाबाबत त्यांच्याशी चर्चा केली जाईल. नेपाळमध्ये चिनी कंपन्यांनी उत्पादित केलेली वीज खरेदी करण्यास भारत इच्छुक नाही. त्यामुळे भारतीय विकसकांच्या सहभागासाठी आम्ही पंतप्रधान मोदींशी चर्चा करू.' 'पश्चिम सेती हायड्रो पॉवर प्रकल्पाच्या विकासासाठी विश्वासार्ह भारतीय कंपनीशी निर्णायक वाटाघाटी आवश्यक आहेत. आम्हाला हिवाळ्यात ऊर्जा सुरक्षिततेसाठी साठवण प्रकाराच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे',असं देउबा यांनी स्पष्ट केलं. या प्रकल्पाव्यतिरिक्त नेपाळ आणि भारत या दोन देशांदरम्यान पंचेश्वर बहुउद्देशीय प्रकल्प विकसित करण्याबाबतही चर्चा सुरू आहे.
    First published:

    पुढील बातम्या