मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोना लसीकरण मोहीम संपताच CAA लागू करणार, अमित शाहांची घोषणा

कोरोना लसीकरण मोहीम संपताच CAA लागू करणार, अमित शाहांची घोषणा

कोरोना लसीकरण मोहीम (Coronavirus Vaccination Drive) संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा (Citizenship Amendment) Act CAA) ) लागू केला जाणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी जाहीर केलं आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

कोलकाता, 12 फेब्रुवारी: कोरोना लसीकरण मोहीम (Coronavirus Vaccination Drive) संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा (Citizenship Amendment) Act CAA) ) लागू केला जाणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी जाहीर केलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत निर्वासितांना नागरिकत्व दिलं जाणार आहे. अमित शाह सध्या पश्चिम बंगालमध्ये आहेत. याठिकाणी विधानसभा निवडणुकीपूर्वी अमित शाह विविध ठिकाणी सभा घेत आहेत. पश्चिम बंगालमधील ठाकुरनगर याठिकाणी रॅलीमध्ये बोलत असताना अमित शाह यांनी ही सीएएबाबतची घोषणा केली. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करत आता त्यांची वेळ संपली असल्याचं म्हटलं आहे.

'सीएए विषयी चुकीची माहिती पसरवणारे लोकं आहेत. पण मी बंधू शंतनू ठाकुर (बोंगाव याठिकाणचे भाजप खासदार) यांना म्हटले होते की मी स्वत: येईन आमि सर्व शंकाचे निरसन करेन. मी काही दिवसांपूर्वी येऊ शकलो नाही (दिल्लीमध्ये इस्रायल दुतावासाबाहेर झालेल्या स्फोटामुळे 30 जानेवारी रोजी अमित शाह यांनी त्यांची ठाकुरनगर मधील रॅली पुढे ढकलली होती). मी येऊ शकलो नाही याचा ममता दी यांना खूप आनंद झाला होता. पण मला त्यांना सांगायला आवडेल की पुन्हा आणि पुन्हा येईल जोपर्यंत मी बंगालला त्यांच्या चुकीच्या नेतृत्वापासून मुक्ती मिळवून देणार नाही', ठाकुरनगरच्या रॅलीमध्ये बोलताना शाह यांनी अशाप्रकारे ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले होते. याठिकाणी मतुआ या रेफ्यूजी समाजाचे वर्चस्व आहे, ज्यांनी 2019 मध्ये भाजपला पाठिंबा दिला होता.

(हे वाचा-Job alert: गावखेड्यातल्या तरुणांना नोकरीची संधी देणारी योजना, कसा मिळेल लाभ?)

अमित शाह पुढे असं म्हणाले की, 'आज भारताचे केंद्रीय गृहमंत्री म्हणून मला या पवित्र भूमितून असे जाहीर करावेसे वाटते की सीएए माझ्या मुस्लिम बांधवांचे नागरिकत्व काढून घेणार नाही. सीएएमध्ये असे करण्यासाठी कोणतेही कलम नाही. हा कायदा नागरिकत्त्व देणारा आहे, ते काढून घेणारा नाही'.

(हे वाचा-परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितला भारताने कोविडमधून घेतला हा मुख्य धडा)

सीएए लागू करण्याबाबत बोलताना अमित शाह म्हणाले की, '2028 मध्ये, आम्ही आमच्या मतुआ बंधू-भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी वचन दिले होते की आम्ही नागरिकत्व कायदा आणू. 2019 मध्ये मतुआच्या बंधू-भगिनींना आम्हाला पूर्ण पाठिंबा दिल्यानंतर आम्ही आमचे वचन पूर्ण केले. आज, मी तुम्हाला खात्री देतो की कोव्हिड-19 लसीकरण प्रक्रिया संपल्यानंतर आम्ही सीएएची अंमलबजावणी करू.'

First published:

Tags: Amit Shah, Caa, Corona vaccine, Covid19, Mamata banerjee, West bengal, World After Corona