Home /News /coronavirus-latest-news /

World after corona : परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितला भारताने कोविडमधून घेतला हा मुख्य धडा

World after corona : परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितला भारताने कोविडमधून घेतला हा मुख्य धडा

jayshankar

jayshankar

परराष्ट्रव्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी कोरोनानंतरच्या जागतिक आव्हानांकडे लक्ष देण्याची कशी गरज आहे ह्याबद्दल सांगितलं आहे.

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : संपूर्ण जग कोरोनाशी (coronavirus) लढतं आहे. कोरोनाच्या या लढ्यात भारतानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. फक्त स्वतःपुरतंच नव्हे तर भारतानं इतर देशांसाठीही मदतीचा हात पुढे केला आहे. जगामध्ये भारतानं लक्षणीय अशी कामगिरी केली आहे. अगदी जागतिक आरोग्य संघटनेनंही भारताचं कौतुक केलं आहे. कोरोनाची लढाई लढता लढता भारतानं एक धडाही घेतला आहे. या लढाईत भारत नेमका काय शिकला हे परराष्ट्र व्यवहारमंत्री (minister of external affairs) डॉ. एस जयशंकर (Dr. S. Jaishankar) यांनी सांगितलं आहे. कोरोनानंतरच्या ग्लोबल डिप्लोमसीबाबत (Global Diplomacy) डॉ. एस जयशंकर यांनी 'न्यूजवीक' मध्ये सविस्तर लेख दिला आहे. ते म्हणाले, कोविड-19 या महासाथीला मागे टाकल्याची आशा बाळगून आपण 2021 मध्ये प्रवेश केला आहे. प्रत्येक समाजाने ही समस्या आपापल्या  पद्धतीने (Unique) हाताळली; पण जागतिक मुत्सद्देगिरीचा  भर काही एकसारख्या विषयांवर (Common Concerns) आणि सर्वांनीच घेतलेल्या धड्यांवर (Shared Lessons) असेल. त्यापैकी बहुतांश गोष्टी जागतिकीकरणाच्या स्वरूपाभोवती फिरतात. आमच्या पिढीला सामान्यपणे आर्थिक दृष्टिकोनातून विचार करण्याची सवय आहे. त्यानुसार आम्ही व्यापार, वित्त पुरवठा, सेवा, दळणवळण, तंत्रज्ञान आणि मोबिलिटीच्या अंगाने विचार करतो. त्यातून आमच्या कालखंडातलं परस्परावलंबित्व आणि विषयांचं परस्परांमध्ये मिसळलेलं असणं लक्षात येतं. कोविडने आपल्या अस्तित्वाची सखोल अविभाज्यता (indivisibility)  लक्षात आणून दिली. खरं जागतिकीकरण (Globalization) महासाथ (Pandemic), हवामान बदल (Climate Change) आणि दहशतवाद (Terrorism) यांच्याशी अधिक निगडित आहे. राजनैतिक चर्चांचा (diplomatic deliberations) गाभा या विषयांशीच संबंधित हवा. ज्याप्रमाणे आपण 2020 मध्ये पाहिलं, तसं या आव्हानांकडे दुर्लक्ष करण्याची फार मोठी किंमत मोजावी लागते. कोविड-19 ने सुरक्षा या विषयाची आपली असलेली समजही नव्याने मांडली आहे. आतापर्यंत सुरक्षा म्हटलं की देश प्रामुख्याने लष्कर, गुप्तचर यंत्रणा, आर्थिक आणि कदाचित सांस्कृतिक गोष्टींवर विचार करत होते. आता ते आरोग्य सुरक्षेवर जास्त भर तर देतीलच; शिवाय विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळ्यांबाबत अधिकाधिक विचार करतील. कोविड 19 काळातल्या ताणतणावामुळे आपल्या सध्याच्या परिस्थितीची नाजूकता उघड झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा धोका कमी करण्यासाठी विकासाची अतिरिक्त इंजिन्स लावण्याची गरज आहे; तसंच अधिक पारदर्शकता आणि व्यापार-व्यवहार्यतेचीही आवश्यकता आहे. बहुपैलू संस्था या अनुभवातून चांगल्या प्रकारे बाहेर आलेल्या नाहीत (त्यांनी त्यातून चांगला धडा घेतलेला नाही). त्यांच्याशी निगडित असलेले वाद बाजूला ठेवू, पण 1945 नंतरच्या या सर्वांत गंभीर जागतिक समस्येला एकत्रितपणे सामोरे जाण्याचा दिखावाही करण्यात आला नाही. ही गंभीरपणे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी बहुपैलुत्वाची फेरबांधणी (Reforming multilateralism) आवश्यक आहे. हे वाचा - EXCLUSIVE: पँगाँगमधून भारतही सैन्य मागे घेणार का? प्रथमच समोर आली ही माहिती 2021 मध्ये ग्लोबल डिप्लोमसीत, कोविड-19 च्या (Covid19) आव्हानांशी मजबूतपणे दोन हात करणं या गोष्टीचा प्रभाव असेल. भारताने आपल्या स्वतःच्या पद्धतीने काम करून आपलं उदाहरण जगासमोर ठेवलं आहे. वाईट घडण्याची भीती घालणाऱ्यांना आव्हान देऊन, आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करून, आरोग्य घडवून भारताने रुग्ण बरे होण्याचा दर वाढवला, मृत्युदर कमी केला. या आकड्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर तुलना केली, तर त्यातून ही गोष्ट स्पष्ट होते. केवळ तेवढंच नव्हे, तर जगाची औषधशाळा (Pharmacy) म्हणून भारताने पुढे पाऊल टाकलं. 150 हून अधिक देशांना भारताने औषधं पुरवली आणि त्यातल्या अनेक देशांना ती मदत म्हणून पुरवली. आमच्या देशात नागरिकांच्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झालाच आहे. त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ग्वाहीनुसार भारताने सर्व जगाला लशी परवडणाऱ्या दरात उपलब्ध करण्याचं कामही आधीच सुरू केलं आहे. भूटान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, मॉरिशस, सेशेल्स, श्रीलंका यांसारख्या केवळ शेजारी देशांमध्येच नव्हे, तर ब्राझील आणि मोरोक्कोसारख्या दूरच्या देशांमध्ये भारतात बनवलेल्या लशींचा पहिल्या टप्प्यातला पुरवठा झाला आहे. हे वाचा - खरंच मोदी सरकार 4000-6000 रुपयांना कोरोना लस विकतंय? अन्य काही जागतिक आव्हानांकडे असंच लक्ष देण्याची गरज आहे. पॅरिस करारातील एक मध्यवर्ती सदस्य म्हणून भारत हवमानाबदलाशी लढण्याच्या आपल्या वचनाशी ठाम आहे. अपारंपरिक ऊर्जेच्या लक्ष्यात भारताने मोठी वाढ केली आहे, जंगलांचं संवर्धन करून हरित पट्ट्यात वाढ केली आहे, देशाच्या जैवविविधतेत वाढ झाली असून, पाणीवापराच्या पद्धतींवरही अधिक लक्ष देण्यात येत आहे. भारतात वापरण्यात आलेल्या पद्धतींचा वापर आता भारताच्या आफ्रिका आणि अन्य देशांतल्या विकासात्मक भागीदारीतही केला जात आहे. एक उदाहरण म्हणून आणि काम करण्याच्या ऊर्जेच्या दृष्टिकोनातून भारतीय मुत्सद्देगिरी इंटरनॅशनल सोलर अॅलियान्स, कोएलिशन फॉर डिझास्टर रेझिलिएंट इन्फ्रास्ट्रक्चर इनिशिएटिव्ह आदींच्या माध्यमातून नेतृत्व करत आहे. दहशतवाद, मूलतत्त्ववाद यांच्याशी दोन हात करण्याचं आव्हानही भयंकर आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा दीर्घ काळ सामना करत असल्यामुळे भारत याबद्दल जागतिक जागरूकता वाढवण्यात आणि एकत्रित कृतीला प्रोत्साहन देण्यात सक्रिय आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य  या नात्याने, तसंच एफएटीएफ आणि जी 20 यांसारख्या देशांचा सदस्य म्हणून भारताच्या मुत्सद्देगिरीचा भर या मुद्द्यांवर राहील. हे वाचा -  सर्वसामान्यांना मोफत कोरोना लस देण्याबाबत निर्णय नाही; मोदी सरकारचा मोठा झटका कोविड-19च्या अनुभवातून मिळालेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिजिटल डोमेनची (Digital Domain) शक्ती. कोविड रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती शोधणं असो किंवा आर्थिक, अन्नधान्याची मदत करणं असो, 2014 नंतर भारताने डिजिटल गोष्टींवर भर दिल्याचे परिणाम आता पाहायला मिळाले. कोविड-19 मुळे 'वर्क फ्रॉम एनिव्हेअर', 'स्टडी फ्रॉम होम' अशा गोष्टींना मोठं बळ मिळालं. या सगळ्यामुळे भारताच्या परदेशातल्या विकासकामांच्या विस्ताराला, तसंच भारताच्या अनेक मित्र देशांना सावरायला मदत होणार आहे. 2020 मध्ये 40 लाखांहून भारतीय पुन्हा भारतात आले. इतिहासातला हा सर्वांत मोठा आकडा आहे. समकालीन कालखंडात मोबिलिटीचं महत्त्व त्यामुळे अधोरेखित झालं. स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि नॉलेज इकॉनॉमी मूळ धरत असल्यामुळे विश्वासार्ह टॅलेंटची निकड वाढणार आहे. मुत्सद्देगिरीद्वारे अशा टॅलेंटची 'मूव्हमेंट' जागतिकदृष्ट्या उपयोगी ठरेल. 2021 मध्ये पुन्हा सगळं पूर्वपदावर येण्यामध्ये सुरक्षित प्रवास, अधिक चांगलं आरोग्य, आर्थिक पुनरुज्जीवन आणि डिजिटल सेवा आदींचा समावेश आहे. नवे संवाद आणि नव्याने समजून घेण्यामध्ये त्या गोष्टी व्यक्त केल्या जातील. कोविड-19 नंतरचं जग हे अधिक बहुध्रुवीय, अधिक गोष्टींचा विचार करणारं आणि नव्याने संतुलन साधलेलं असेल. आणि भारत आपल्या अनुभवांच्या आधारे बदल घडवण्यासाठी मदत करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Published by:news18 desk
First published:

Tags: Corona, Covid19, Terrorism, Work from home, World After Corona

पुढील बातम्या