नवी दिल्ली, 05 जुलै : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपलं पहिलं आर्थिक बजेट सादर केलं. यावेळी अर्थ संकल्पामध्ये काम मिळणार? काय स्वस्त होणार? काय महाग होणार? याकडे लक्ष लागून राहिलं होतं. दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढण्यासाठी इलेक्ट्रिक कारवर 5 टक्के GST लावण्याची घोषणा केली आहे. तर, इलेक्ट्रिक कार लोनवर सरकार 1.5 लाखाची सुट देणार आहे. इलेक्ट्रिक कारवरील जीएसटी 12 टक्क्यावरून 5 टक्के करण्याची मागणी करण्यात येत होती. इलेक्ट्रिक कारला चालना देण्यासाठी सरकार सर्व कमर्शियल कार या 2026 पर्यंत इलेक्ट्रिक करण्याचा विचार करत आहे. तर, इलेक्ट्रिक कारसाठी दिल्ली – जयपूर हायवेवर काही चार्जिंग स्टेशन्श देखील तयार करण्यात येणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इलेक्ट्रिक कार घ्या कर्जात सुट मिळवा अशी घोषणा केली आहे.
Union Budget 2019 : Income Tax भरण्यासाठी आता PAN Cardची गरज नाही
पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्या
र्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत असताना सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं ते काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार याकडे. दरम्यान, Petrol, Diesel आणि सोनं महाग झालं आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून Petrol आणि डिझेलचे नवे दर लागू होणार आहेत.Petrol आणि Dieselवर 1 रूपया सेस वाढवल्यानं Petrol, Dieselच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. 1 रूपयांनी सेस वाढवल्यानं आता पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत 2 रूपयानं वाढ होणार आहे.
Union Budget 2019 : ‘सरकारी कंपन्यांच्या जमिनींवर परवडणारी घरं बांधणार’
सोन्याचे दर वाढले
दरम्यान, सोन्याच्या दरात देखील वाढ होणार आहे. सोन्यासह इतर मौल्यवान रत्नांवरची कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. सोन्यावर सरकारनं 12 टक्के कस्टम ड्युटी केली आहे. त्यामुळे सोन्याचा किंमतीमध्ये देखील वाढ झाली आहे.
भाजपसह काँग्रेसलाही धक्का; शेट्टी, राज आणि राष्ट्रवादीचं नवं गणित