Union Budget 2019 : Income Tax भरण्यासाठी आता PAN Cardची गरज नाही

Union Budget 2019 : मोदी सरकारनं Income Tax भरणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2019 01:24 PM IST

Union Budget 2019 : Income Tax भरण्यासाठी आता PAN Cardची गरज नाही

नवी दिल्ली, 05 जुलै : Income Tax भरण्यासाठी PAN Card हवंच असा सरकारचा आजपर्यंतचा नियम होता. PAN Card नसल्यास आयकर भरणं शक्य होत नव्हतं. पण, आता काळजी करण्याची कारण नाही, तुम्ही PAN Card शिवाय देखील Income Tax भरू शकता. होय, आता PAN Card नसल्यास Income Tax भरणं शक्य होणार आहे. Income Tax भरण्यासाठी आता PAN Card ऐवजी आधार कार्ड चालणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर सरकारचं हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे कोणत्या घोषणा होणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्याचे देखील आभार मानले.

Union Budget 2019 : भाड्यानं घर घेऊन राहणाऱ्यांसाठी खुशखबर

पाच वर्षात वाढले करदाते

महत्त्वाची बाब म्हणजे 2014 ते 2019 या पाच वर्षाच्या काळात करामध्ये मोठी वाढ झाली आहे. कारण, मागील 5 वर्षामध्ये 6.38 लाख कोटीवरून 11 लाख कोटीपर्यंत करात वाढ झाली आहे. मागील पाच वर्षामध्ये करामध्ये 78 टक्के वाढ झाली असल्याची माहिती देखील निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

विमा क्षेत्रात 100 टक्के FDI

Loading...

देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यावर मोदी सरकार आता भर देताना दिसत आहे. याची प्रचिती अर्थसंकल्पामध्ये दिसत असून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणामध्ये स्पष्ट केलं. आपल्या भाषणामध्ये निर्मला सीतारामन यांनी पुढील पाच वर्षामध्ये देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर करण्याचं लक्ष्य असल्याचं म्हटलं आहे. शिवाय, विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारचं हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.

'तुला कसली भीती नाही का?' नितेश राणेंच्या गुंडगिरीचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 01:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...