Union Budget 2019 : ‘सरकारी कंपन्यांच्या जमिनींवर परवडणारी घरं बांधणार’

Union Budget 2019 : सरकारी कंपन्यांच्या जमिनींवर परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली

News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2019 12:12 PM IST

Union Budget 2019 : ‘सरकारी कंपन्यांच्या जमिनींवर परवडणारी घरं बांधणार’

नवी दिल्ली, 05 जुलै : अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मोदी सरकारचं बजेट सादर करत आहेत. यावेळी कोणत्या घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, सरकारी कंपन्यांच्या जमिनींवर परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. सर्वानं हक्काचं घर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं यापूर्वीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता सरकारी कंपन्यांच्या जमिनीवर परडवणाऱ्या घरांची निर्मिती करणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. 2021 पर्यंत 1.95 कोटी घरं बांधण्याचं लक्ष्य असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. शिवाय, या घरांमध्ये गॅस, विज आमि टॉयलेटची व्यवस्था असणार अशी घोषणा देखील निर्मला सीतारामन यांनी केली. यावेळी निर्मला सीतारामन यांनी देशाची अर्थव्यवस्था वेगानं वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केलं. तर, 114 दिवसांत आता एक घरं बांधलं जात असल्याची माहिती यावेळी निर्मला सीतारामन यांनी दिली.

प्रधानमंत्री आवास योजना

यापूर्वी देखील प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत पहिलं घर घेणाऱ्यांसाठी 2.67 लाखांची सबसिडी सरकारच्या वतीनं देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 2022 पर्यंत सर्वांना हक्काचं घर देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये सरकारी कंपन्यांच्या जमिनींवर परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणार असल्याची घोषणा केली. 2021 पर्यंत ही घरं दिली जाणार आहेत. दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचं हे पहिलंच बजेट आहे. त्यामुळे आजच्या बजेटकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. शिवाय, दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर आता मोदी सरकारकडून सर्वसामान्यांच्या आशा-आकांक्षा देखील वाढल्याचं दिसून येत आहे.

'तुला कसली भीती नाही का?' नितेश राणेंच्या गुंडगिरीचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 11:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...