Home /News /national /

'तुम्ही घरी येणार ना?' मृत्यूच्या काही तासांआधी लेकीनं पोलीस बाबांकडून घेतलं वचन पण...

'तुम्ही घरी येणार ना?' मृत्यूच्या काही तासांआधी लेकीनं पोलीस बाबांकडून घेतलं वचन पण...

इंदूरमधील पोलीस ठाण्याचे प्रभारी यशवंत पाल यांचा कोरोनाने आज सकाळी मृत्यू झाला. लॉकडाऊन दरम्यान ड्युटीवर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

    उज्जैन 22 एप्रिल : कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. आता वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसही कोरोनाच्या जाळयात अडकत आहे. इंदूरमधील पोलीस ठाण्याचे प्रभारी यशवंत पाल यांचा कोरोनामुळे आज सकाळी मृत्यू झाला. दुपारी त्यांच्यावर इंदूरच्या रामबाग मुक्तिधाम येथे राज्य सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी आणि दोन्ही मुली हजर होत्या. दरम्यान, सोमवारी रात्री यशवंत पाल यांनी आपल्या मुलींशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला होता. डॉक्टर सुमित ठक्कर यांना सांगितले की टीआय यशवंत पालचे यांनी सोमवारी रात्री 9.12च्या सुमारास कुटुंबीयांशी संवाद साधला. यशवंत पाल यांच्या पत्नीने डॉक्टरांनाही निरोप दिला होता की, 'डॉक्टर तुमचे आभार. तुम्ही त्यांची काळजी घ्या. तुमच्याकडून आता आम्हाला आशा आहे". त्यानंतर यशवंत पाल यांनी आपल्या मुलींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हाताने हावभाव केले आणि 'मी ठीक आहे' असे सांगितले. वाचा-कौतुक करावं तेवढं थोडं! तब्बल 21 किमी धावून वेळेत ड्युटीवर पोहोचला बस कंडक्टर असा होता यशवंत पाल यांचा कुटुंबाशी अखेरचा संवाद मुलगी- बाबा तुम्ही कसे आहात? यशवंत पाल हाताने इशारा करत-खुप छान मुलगी- बाबा, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. तुम्ही आमचा आत्मविश्वास वाढवता. तुम्ही नक्की कोरोनाला हरवणार. यशवंत पाल मुलींना हिम्मत ठेवण्यास सांगतात मुलगी-बाबा, तुम्ही लवकर याल ना घरी? पत्नी-बघा, आम्ही सगळे तुमची वाट बघत आहोत. लवकर घरी या. वाचा-लेकाला खांद्यावर घेत बापानं केला 500 किमी पायी प्रवास, पण घरी पोहचल्यानंतर... इंदूरमध्ये 2 पोलिसांचा मृत्यू आपल्या कुटुंबाशी संवाद साधल्यानंतर यशवंत पाल यांनी विश्रांती केली मात्र, पहाटे त्यांनी प्रकृती बिघडली. त्यानंतर मात्र त्यांना मृत्यू झाला. याआधी शनिवारी इंदूरमध्ये कोरोनाशी लढताना पोलीस स्टेशनचे प्रभारी देवेंद्र चंद्रवंशी यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. झाले. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लॉकडाऊन ड्युटीवर असताना या दोघांना कोरोनाची लागण झाली. वाचा-मुंबईमध्ये कोरोना मोठ्या संख्येने वाढणार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा रिपोर्ट कुटुंबाला अंतिम दर्शनही मिळालं नाही नई दुनियाने दिलेल्या वृत्तानुसार, पाल यांच्या अंतिम दर्शनासाठी कुटुंबियांनी गर्दी गेली होती. मात्र त्यांना अंतिम दर्शन मिळाले नाही. अखेर त्यांच्या छायाचित्राला कुटुंबीयांनी पुष्पांजली वाहिली. यादरम्यान, पाल यांनी मोठी मुलगी स्वत: ला रोखू शकली नाही आणि वडिलांच्या फोटोला धरून ढसाढसा रडू लागली. वाचा-हजारो भारतीयांच्या जीवाशी खेळ, चीनचे रॅपिड टेस्ट किट निघाले खराब कुटुंबाची केली कोरोना चाचणी यशवंत पाल यांच्या कोरोनाला संसर्ग झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे नमुनेही घेण्यात आले. यानंतर त्यांची पत्नी आणि दोन्ही मुली उज्जैनमधील हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. परंतु अद्याप कुणाचीही माहिती मिळालेली नाही. आता पोलीस अधिकारी आरोग्य विभागाकडून या संदर्भात माहिती घेत आहेत. संपादन-प्रियांका गावडे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या