मुंबई, 22 एप्रिल : जगभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. कोरोनाची वेगवान चाचणी करणारं रॅपिड टेस्ट किट भारतात खराब निघाल्यानं मोठा गोंधळ उडाला आहे. हे किट खराब झाल्याच्या काही राज्यांकडून तक्रारी आल्यानंतर त्याची IMCRकडून दखल घेण्यात आली आहे. पुढचे दोन दिवस 2 दिवस रॅपिड टेस्ट किटचा उपयोग न करण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत 4 लाख 49 हजार 810 चाचण्या झाल्या आहेत. सोमवारी 35 हजारहून जास्त टेस्ट किटचे वाटप करण्यात आले होते. दक्षिण कोरियातील कंपनीने हरियाणामध्ये रॅपिड अँन्टीबायोटीक टेस्टसाठी हरियाणामध्ये शाखा सुरू करण्यात आली आहे. एस.डी. बायोसेन्सर नावाच्या या कंपनीने हरियाणा इथे त्यांचं रॅपिड टेस्ट किट संदर्भात उत्पादन सुरू केलं आहे. ज्यामध्ये 5 लाख किट तयार करण्याची क्षमता आहे. दक्षिण कोरियाची राजधानी सोलमधील भारतीय दूतावासाने एका निवेदनात ही माहिती दिली आहे. हे वाचा- Lockdown दरम्यान टायगर-दिशा राहतायत लिव्ह इनमध्ये? कृष्णा श्रॉफनं सांगितलं सत्य राजस्थानने परीक्षण थांबवले कोरोनाचा निकाल योग्य येत नसल्याच्या कारणाने राजस्थान सरकारने या किटचा उपयोग तातडीने थांबवला. आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा यांनी सांगितले की, या किटच्या तपासाच्या निर्णयाचा तपशील आयसीएमआरला पाठविण्यात आला आहे. मंत्रीनी दिलेल्या माहितीनुसार यातून केवळ 5 टक्के वैध परिणाम मिळतात. डॉ. रघु शर्मा म्हणाले, यापूर्वी संक्रमित झालेल्या 168 प्रकरणांमध्ये या किटची चाचणी घेण्यात आली आहे, परंतु केवळ 5.4 टक्के निकाल योग्य आला आहे आणि जर निकाल योग्य नसतील तर चाचणी करून काय फायदा? ते म्हणाले, ‘तसेही या चाचण्या अंतिम नव्हत्या कारण त्यानंतर पीसीआर चाचण्या घ्याव्या लागतात. या तपासणीचा काही उपयोग होत नाही असा सल्ला आमच्या डॉक्टरांच्या पथकाने दिला आहे. राज्य सरकारने आयसीएमआरला हे निकाल पाठवले आहेत आणि या चाचणी किटचा वापर सुरू ठेवावा की नाही हे विचारले आहे. पश्चिम बंगाल सरकारनेही या चाचण्या खराब असल्याचा आरोप केला आहे. हे वाचा- वाधवान कुटुंबीयांना सीबीआयकडे सोपवणार, अनिल देशमुख यांनी केलं जाहीर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.