मुंबई, 22 एप्रिल : कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. तर दुसरीकडे हा संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपलं कार्य करत आहेत. आतापर्यंत पोलीस, डॉक्टर आणि परिचारकांची कहाणी वाचली सर्वांसमोर आली पण महाराष्ट्रातील एका छोट्याश्या गावातून येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचं कौतुक केलं जात आहे. मुंबईपासून 100 किलोमीटर दूर अंतरावर असणारं मनोर गावातून एसटी चालक मुंबईला येतात. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात ते एसटी कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना एकही वाहन मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या गावापासून त्यांना तब्बल 21 किलोमीटर चालत यावं लागतं. या प्रवासात मध्ये एखादा ट्रक किंवा टेम्पोवाला भेटलाच तर त्यांना वेळेत पोहोचणं शक्य होतं आणि कमी चालावं लागतं.
देविदास राठोड असं या कंडक्टरचं नाव आहे. आधीच लॉकडाऊन आणि त्यात रविवार असल्यानं त्यांना वाहन मिळालं नाही. त्यामुळे त्यांना ड्युटीवर पोहोचण्यासाठी उशीर होऊ नये म्हणून ते तब्बल 21 किलोमीटर धावत निघाले आणि ते आपल्या ड्युटीच्या वेळेवर तिथे हजर झाले. ड्युटीवर जाताना आणि सुटल्यावर दोन वेळा त्यांना 21 किलोमीटरचा पायी प्रवास करून घरी पोहोचावं लागतं.
हे वाचा-कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी वापरलं जाणारं 'हे' औषध ठरतंय जीवघेणं
कंडक्टर म्हणून कार्यरत असलेले देविदास राठोड यांच्यावर पालघर ते मुंबई सेंट्रल बसची वाहतूक करण्याची जबाबदारी आहे. त्यांच्या या बसमधून केईएम रुग्णालयात जवळपास 20 ते 25 डॉक्टर आणि परिचारिकांना पोहोचवण्याची जबाबदारी आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर आणि नर्सचं महत्वाचं योगदान आहे. त्यामुळे मला वेळेत पोहोचणं गरजेचं होतं. अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. देविदास राठोड यांचं पालघर एसटी डेपोच नाही तर सर्व स्तरातून कौतुक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
हे वाचा-संकटकाळात कामी येईल तुमचं ATM, मोदी सरकार देतंय या सुविधा मोफत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.